परशुराम शेवंगे याची वंचित बहुजन आघाडीच्या प्रसिध्दी प्रमुख पदी निवड.

✒️पुणे जिल्हा प्रतिनिधी✒️
पुणे,दि.23 ऑगस्ट:- ऐड. प्रकाश आंबेडकर याच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे पक्ष बाधणीचा कार्यक्रम संपुर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. त्यात पार्श्वभुमीवर वंचित बहुजन आघाडीया पुरोगामी विचाराने चालणाऱ्या व आरक्षणवादी असणार्या पक्षाने परशुराम शेवंगे याची पुणे कँन्टोमँन्ट विधानसभा मतदार संघ प्रसिध्दी प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वीकडे त्यांच अभिनंदन करण्यात येत आहे.
त्यावेळी परशुराम शेवंगे यांनी आपले विचार प्रकट केले. आज मला वंचित बहुजन आघाडीने मला जी जबाबदारी दिली त्याच निर्वाहान मी तन, मन धनाने करणार, आज पर्यत आपण मला अनेक माध्यमातुन सहकार्य करत आले आहात व एक मिञ म्हणुन सदैव माझ्या पाठिशी उभे होतात व एक कार्यकरर्ता म्हणुन एक ओळख आपण मला दिलीत त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासुन धन्यवाद व आभार. अशीच साथ येणाऱ्या काळात आपण मला द्याल हि एक आशा व्यक्त करतो.