पिपलळरा येथे वृक्ष लागवड अभियान

देवेंद्र सिरसाट
हिंगणा तालुका (नागपूर) प्रतिनिधी
9822917104
हिंगणा , 23 ऑगस्ट : – अंबुजा सिमेंट फाउंडेशन हिंगणा, तसेच ग्रामपंचायत पिपळधरा यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड व संवर्धन कार्यक्रम ग्रामपंचायत पिपळधरा अंतर्गत नागाझरी, कटंगधरा व मांडवा या ठिकाणी राबविण्यात आला. या वेळी सिताफळाचे 150 वृक्ष लावण्यात आली, या अभियानात ग्रामपंचायत पिपळधरा येथील ग्रामपंचायतचे पदाधिकारी,यांच्या पुढाकाराने हे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणचा समतोल व शुद्ध हवा, शाश्वत विकासासाठी वृक्ष लावणे आवश्यक आहे असे मत सरपंच नलिनी शेरकुरे यांनी व्यक्त केले. या उपक्रमात लागवड केलेल्या वृक्ष संवर्धन करण्याकरिता नांगरिकांनी सहकार्य करावे असेही सरपंच शेरकुर या वेळी म्हणाल्या.
या उपक्रमाअंतर्गत प्रथम टप्यात 50 वृक्ष लागवड करण्याचे तसेच सर्वधन करण्याचे कार्य या वेळी पार पडले, दुसऱ्याऱ्या टप्प्यात 50 वृक्षांची लागवड होणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंबुजा सिमेंट फाउंडेशन हिंगणा नागपुर,तसेच ग्रामपंचायत पिपळधरा चे सहकार्य असणार आहे .या वृक्ष लागवड अभियानांतर्गत सर्वांनी सहकार्य करावे असे आव्हाण सरपंच नलीनी शेरकुरे यांनी यावेळी केले. यावेळी सदस्य,विनोद आत्राम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका रामटेके मॅडम, पोद्दार मॅडम ,पोटफोडे मॅडम पिसे मॅडम ग्रामसेवक नितिन उमरेडकर आशा फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम शेरकुरे , अंबुजा फाउंडेशन चे वसंती कडुकर मॅडम निखिल काटवे, सारिका रंगारी व गावातील युवा वर्ग उपस्थित होते.