भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिवेशन वाशिममध्ये संपन्न 

58

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिवेशन वाशिममध्ये संपन्न 

अजय उत्तम पडघान

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

मो: 7350050548

शासकीय विश्रामगृह येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिवेशन संपन्न झाले. यावेळी सर्वानुमते जगदीश मानवतकर यांची ता. सचिव पदी निवड करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणुन कॉ. संजय मंडवधरे यांची तरउ पस्थिती मध्ये वाशीम येथील भाकपचे युवा नेते प्रो. जगदिश मानवतकर सर, मंगरूळपीर येथील भाकपचे ज्येष्ठ नेते रमेश मुंजे मानोरा येथील मीरा बेलखेडे, वाशीम येथील सुप्रसिद्ध युवा सर्प मित्र मयुरेश मानधने, वाशीम येथील अॅड.संतोष केसवानी, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाठोरे हे उपस्थित होते.

या वेळी संजय मांडवधरे यांनी पक्षाची स्थापना तर आता पर्यंत ची पक्षाची सुवर्ण वाटचाल कशी झाली, या पक्षाने कोणते आंदोलने केली, पक्षाची पुढची वाटचाल कशी असेल या विषयी माहिती दिली. तर जगदीश मानवतकर यांनी आपल्याला वाशीम मध्ये कश्या प्रकारे पक्षाची ध्येयधोरण ठरवून शेतकरी शेतमजूर कष्टकरी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्यासाठी व योग्य दिशा ठरवून बांधणी करण्यासाठी या विषयी विस्तृत मार्गदर्शन केले.

यावेळी कॉ. रमेश मुंजे साहेबांनी सुध्दा नवीन सदस्यांना अभ्यासपूर्ण भाषण करून अनमोल असे मार्गदर्शन केले. या वेळी नितेश सावके यांनी प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन नितीन बांगर यांनी केले.  या कार्यक्रमांत सोनु मणेर, गजानन इंगोले, अक्षय इंगोले, रामदास कालापाड, अरविंद इंगोले, बादल वानखेडे, विकास खडसे, आकाश कांबळे यांनी आपली सदस्य नोंदनी केली व या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.