सगळी कारागृह मोकळी करा, कायदा समान आसायला हवा, जितेंद्र आव्हाडांनी अधिवेशनात केली मागणी
शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
रोहा:बिलकिस बानो बलात्कार प्रकरणात जन्मठेप भोगणाऱ्या 11दोषींना मुक्त करण्यात आले आहे.
हे सर्वजण गोध्रा येथील तुरुंगात शिक्षा भोगत होते. गुजरात सरकार च्या माफी योजनेंतर्गत या सर्वाना मुक्त करण्यात आले आहे,सर्व आरोपी 2002 मध्ये बिलकिस बानो नावा च्या महिलेवर सामुहिक बलात्कार व या हिंसाचारात बानो च्या घरातील सात सदस्यांची हत्या प्रकरणात जन्मठेपे ची शिक्षा भोगत होते.
मुंबईतील एक विषेश सी बी आय कोर्टाने 21 जानेवारी 2008 मध्ये 11 जणांना दोषी ठरवून बिलकिस बानो रेप केस मध्ये जन्मठेप सुनावली होती.गुजरात सरकार ने एक समिती स्थापन करून त्याचे प्रमुख पंच महलचे जिल्हाधिकारी सुजल माएत्रा आसुन त्यांनी म्हटले की,समितीने एक मताने निर्णय घेतला की सर्व 11 आरोपीना माफी द्यावी.
समितीचा निर्णय गुजरात सरकार ला कळविण्यात आला. त्यानंतर सर्वाना तुरुंगातून मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले होतो.तरी बिलकिस बानो प्रकरणातल्या आरोपींना भारता च्या 75 व्या अमृत महोत्सव निमित्त सोडण्यात आले आहे.
आरोपी चे पेढे भरवून स्वागत ही करण्यात आले आसल्याने त्यांची रॅली ही कारण्यात यावी सर्व बलात्कारी प्रकरणातील आरोपीना आश्याच प्रकाडे मुक्त करण्यात यावे आशी मागणी चोहो बाजु होत आहे.
मग इतर गुन्ह्यातल्या आरोपी ना ही सोडा. एकाला एक आणि बाकी च्यांना दुसरा,आस का? सगळी कारागृह मोकळी करा. कायदा समान आसायला हवा. अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी ही अधिवेशनात केली आहे.