‘वरली मटका-जुगार’ विरुद्ध वाशिम पोलीस दलाची धडक मोहीम

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

अजय उत्तम पडघान

मो: 7350050548

‘वरली मटका-जुगार’ विरुद्ध वाशिम पोलीस दल सजग; वर्षभरात ५९७ प्रकरणांमध्ये पंधराशेच्या वर आरोपींवर गुन्हे दाखल. वाशिम पोलीस घटकातील पो. स्टे. मालेगाव, पो. स्टे. मंगरुळपीर हद्दीत तीन ठिकाणी जुगार अड्डयांवर पोलीसांनि छापा टाकला आहे. त्यामध्ये पो. स्टे. हद्दीतील कृषी उत्पन्न बाजार समिती, येथे काही इसम मोकळ्या जागेत ताश पत्त्यावर पैसे लावून हारजीतचा खेळ खेळत असल्याची गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून तेथे पो. स्टे. मालेगाव येथील पथकाने धाड टाकून ताश पत्त्यावर पैसे लावून हारजीतचा खेळ खेळणाऱ्या ०९ इसमांना १६९५० रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.

दुसऱ्या कारवाईमध्ये पो. स्टे. मंगरूळपीर हद्दीतील मौजे गिंभा येथे काही इसम टिनाचे शेडजवळ ५२ पत्त्यांचा हारजीतचा जुगार खेळत असल्याची माहिती प्राप्त झाल्यावरून सदर ठिकाणी पो. स्टे. मंगरूळपीर येथील पथकाने जाऊन धाड टाकली असता ५२ पत्त्यांचा हारजीतचा जुगार खेळनाऱ्या एकूण ०७ इसमांना १५९० रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.

तिसऱ्या कारवाईमध्ये पो. स्टे. मानोरा हद्दीतील ग्राम आसोला खुर्द तांडा येथे काही इसम टीनपत्र्याच्या खोलीत जुगार खेळवत असल्याच्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम येथील पथकाने सदर ठिकाणी जाऊन धाड टाकली असता ०५ इसम टीनपत्र्याच्या खोलीत जुगार खेळत असल्याचे दिसून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १, ५४, २२० /- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य स्थापित व्हावे यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे अवैध धंद्यांविरोधात कारवाईचे सत्र सुरु आहे. माहे ऑगस्ट – २०२२ मध्ये दि. २०. ०८. २०२२ पावेतो वाशिम पोलीस घटकात एकूण ‘वरली मटका-जुगार’ विरोधात ४१ प्रकरणांमध्ये ८० आरोपींविरोधात गुन्हे नोंदविले असून त्यामध्ये २, ७४, ५६५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

त्याच पार्श्वभूमीवर अवैध धंदे ‘वरली मटका-जुगार’ विरोधात वाशिम पोलीस दलाने वर्षभरात धडाकेबाज कारवाई करत तब्बल ५९७ प्रकरणांमध्ये १५००च्या वर आरोपींवर गुन्हे दाखल केले असून त्यामध्ये जवळपास ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागरिकांनी अवैध धंद्याबाबतची माहिती स्थानिक पोलीस अधिकारी अंमलदार यांना द्यावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here