अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला ; प्रियकरासह संपविण्याचा प्रयत्न 

46

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला; प्रियकरासह संपविण्याचा प्रयत्न 

अजय उत्तम पडघान

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

मो: 7350050548

आपल्याच आतेभावासोबतच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा गळा आवळून हत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज २१ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रिसोड तालुक्यातील देगाव येथील माधव वामन भुतेकर वय ३५ वर्ष हा त्यांची पत्नी वय २८ व त्यांच्या दोन मुली व एक मुलगा यांच्यासह राहतो. मात्र त्याच्या पत्नीचे तिचा आतेभाउ गजानन काळे (रा. तिवळी ता. मालेगांव जी. वाशिम) याच्याशी अनैतिक संबंध होते. यावरून माधव आणि त्याच्या पत्नीचे यांच्यात खटके उडायचे. त्यामुळे माधवचे आई-वडीलही नाराज असायचे आणि याला विरोध करायचे.काही दिवसांपूर्वी याच गोष्टीवरून माधव आणि गजाननमध्ये भांडण झाले होते. माधव २० ऑगस्ट रोजी रिसोड तालुक्यातील बिबखेडा या गावी मिस्त्री कामासाठी गेला होता. पण रात्री उशिराही तो घरी परतला नाही.

माधवच्या वडिलांनी वामन च्या पत्नीला विचारपूस करायला सांगितले.पण पत्नीने कसलेही सहकार्य केले नाही. रात्र उलटून गेली तरी माधव घरी आला नाही.सकाळी ही बातमी गावात पसरताच गावातील लोकं माधवच्या शोधासाठी निघाले. गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने रिसोड आणि बिबखेडा येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये गजानन काळे माधव यास दुचाकीवरून रिसोडकडे नेल्याची बाब उघड झाली.

हा प्रकार गजाननला समजताच त्याने स्वत:ला शिरपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. शिरपूर पोलिसांनी गजानन काळे याला रिसोड पोलिसांच्या ताब्यात दिले. गजाननने माधवचा गळा आवळून त्याला रिसोड लोणी मार्गावरील गिरीराज ढाब्याच्या काही अंतरावर असलेल्या झुडपात फेकून दिले. याबाबत माहिती मिळताच माधव ला घटनास्थळावरून उचलून रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांची प्रकृती चिंताजनक पाहून त्यास वाशिमला पाठवण्यात आले.

माधववर वाशिम येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.याबाबत माधवचे वडील वामन धोंडूजी भुतेकर यांनी रिसोड पोलिसात तक्रार दिली आहे. आणि त्यांची सून आणि गजानन काळे यांनी मिळून माधवला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांनी माधवची पत्नी आणि प्रियकर आतेभाउ गजानन काळे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. रिसोडचे ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर यांनी पोलीस कर्मचार्‍यांसह घटनेचा आढावा घेत तेथून माधव यांचा मोबाईल, टिफीन व इतर साहित्य जप्त केले व घटनास्थळाचा पंचनामाही केला आहे व पुढील तपास ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र गवई व कर्मचारी करीत आहेत.