चंद्रयान – 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग, दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश
मनोज कांबळे:एकिकडे चंद्रयान-३ द्वारे भारत चंद्रावर जो प्रकल्प करण्याचा प्रयत्न करीत होता तो अतिशय कठीण होता. कारण आजवर जगभरात ते कुणीहि केलेले नाही. अमेरिकेसारख्या प्रगत देशांनी आजवर चंद्राच्या पृष्ठभागावर अनेक यान लँड केलेली आहेत. परंतु चंद्रयान-३ हे चंद्राच्या महिन्याच्या दक्षिणी ध्रुवक्षेत्राजवळ लँड करण्याची इसरोची योजना होती आणि हे अशक्यप्राय काम इसरोच्या शास्त्रज्ञानी प्रचंड मेहनतीने यशस्वी करून दाखवले आहे.
२३ ऑगस्टचा हा दिवस इसरोच्या इतिहासात सुवर्णअक्षराने लिहिला जाईल. आज चंद्रयान – ३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करण्यात इसरो यश मिळाले. चंद्रावर लँडिंग करणारा भारत चौथा देश,आहे. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर चांद्रयान लँड केले होते.
चंद्राच्या ध्रुवावर जाणारे आपण पहिले आहोत. मी सगळ्या टीमचे प्रचंड आभार मानतो. इस्रोच्या सगळ्या मॅनेजमेंटचं आभार मानतो अशी प्रतिक्रिया चंद्रयान 3 च्या प्रमुखांनी दिली आहे.