स्वर्गीय माणिकराव जगताप आबासाहेब माजी आमदार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धा संपन्न 

मीडियावार्ता

महाड प्रतिनिधी

महाड येथील लोकविकास सामाजिक संस्थेचे एम एम जगताप कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स व एम एम जगताप इंग्लिश मीडियम स्कूल व जुनियर कॉलेज महाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वर्गीय माणिकराव जगताप आबासाहेब माजी आमदार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धा शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी संपन्न झाल्या.

सदर कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून पोलादपूर कॉलेजचे प्राचार्य व सिनेट मेंबर डॉ दीपक रावेरकर हे उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून लोकविकास सामाजिक संस्थेचे सदस्य माजी सभापती पंचायत समिती मा संजयजी चिखले यांनी भूषवले तर परीक्षक म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद चे जिल्हाध्यक्ष मा श्री अ वि जंगम,माजी मुख्याध्यापक। डॉ रवींद्र सोमोशी सुंदरराव मोरे कॉलेज पोलादपूर व डॉ सुभाष कदम दोशी वकील कॉलेज गोरेगाव हे उपस्थित होते, याशिवाय रायगड जिल्ह्यातील सुमारे पंधरा महाविद्यालयातील 25 स्पर्धकांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

त्यामध्ये प्रथम क्रमांक कुमार साखिलकर श्रेया सुनील सीडी देशमुख कॉलेज रोहा, द्वितीय क्रमांक गुप्ता केतन दिनेश जे एन पालीवाला कॉलेज पाली आणि तृतीय क्रमांक घोसाळकर सायली एम ए बी मोरे कॉलेज धाताव रोहा तर उत्तेजनार्थ दि जी तटकरे कॉलेज माणगाव येथील रणपिसे विद्या ज्ञानेश्वर यांनी पटकावला त्यांना अनुक्रमे 2100 रुपये ,1500 रुपये व 1000 रुपये व गौरव चिन्ह आणि प्रशस्तीपत्रे देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ रावेरकर म्हणाले की, अशा स्पर्धांमधूनच मुलांच्या अंगातील सभाधीटपणा वृद्धीगत होतो व उत्कृष्ट वक्ता नेता बनण्यासाठी प्रेरणा मिळते। त्याचबरोबर परीक्षकांनीही मुलांच्या वक्तृत्वाचे कौतुक केले तसेच भाषेतील व्याकरणाविषयी बोलताना प्रा। सोमवंशी सरांनी मार्गदर्शन केले तसेच जंगम सरांनी भविष्यात वक्त्यांसाठी आयोजित मराठी साहित्य परिषदेमार्फत शिबिर भरवण्यात येईल असे जाहीर केले तर डॉ कदम सरांनी विद्यार्थ्यांनी भविष्यकाळासाठी अशा स्पर्धात्मक परीक्षा करिता अशा वकृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असे जाहीर केलेत सदर कार्यक्रमाकरिता संस्थेचे अध्यक्ष मा नानासाहेब जगताप यांनी सर्व विद्यार्थ्यांना कर्मचारी वर्गांना शिक्षकांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या आणि कौतुक केले.

प्राचार्य स्मिताली यादव ज्युनिअर कॉलेज यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर कॉलेजचे प्राचार्य डॉ एम एन वाणी यांनी आपले मनोगत व्यक्त करून स्पर्धेबाबतची पार्श्वभूमी सांगितली तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष चिखले सर यांनी अशा स्पर्धा आबासाहेबांच्या जन्मदिनी दरवर्षी भरविण्यात याव्यात आणि या स्पर्धा राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवाव्यात असा मानस बोलून दाखविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योजना हळदी व कल्याणी शिंदे यांनी केले तसेच स्वाती पवार यांनी सर्व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले सदर कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागातील अनामिका तांबडे ,मोक्षदा वल्ले, अल सीमा मुकादम या शिक्षकांनी केले सदर स्पर्धेला अल्प कालखंडात उत्कृष्ट सहभाग व प्रतिसाद मिळाल्याबद्दल सर्व रायगड जिल्ह्यातील प्राचार्यांकडून कौतुक केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here