राज्यस्तरीय लेख स्पर्धेत श्याम ठाणेदार यांचे यश

कोल्हापूर प्रतिनिधी

आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या ( शतकोत्तर रौप्यमहोत्सवी ) जयंती वर्षानिमित्त मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने कॉम्रेड मणिशंकर कवठेकर स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्रातील सर्वांसाठी अत्रे प्रहार खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यभरातील १२५ हुन अधिक वृत्तपत्र लेखकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत दौंडमधील ( जिल्हा पुणे ) प्रसिद्ध स्तंभलेखक श्याम ठाणेदार यांच्या लेखाला तृतीय क्रमांक मिळाला. महाराष्ट्राचे कौशल्य विकासमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री नामदार मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते श्याम ठाणेदार यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध वर्तमानपत्रात सातत्याने लेखन करणाऱ्या पत्र लेखकांनाही गौरविण्यात आले.

मुंबईतील ( दादर ) येथील मामा काने सभागृहात मंगळवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी हा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी मुंबई वृत्तपत्र लेखक संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, प्रशांत घाडीगांवकर ( प्रमुख कार्यवाह ) नितीनजी वैद्य ( जेष्ठ पत्रकार राष्ट्र सेवादल, चित्रपट निर्माते ) दिवाकरजी वळवी ( कामगार नेते ) सुरेशजी कदम ( प्रसिद्ध उद्योजक ) प्रदीपजी कवठे ( सामाजिक कार्यकर्ते ) आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यभरातील वृत्तपत्र लेखक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते. या स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल श्याम ठाणेदार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here