*नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या लग्नसमारंभात ५०० लोकांच्या उपस्थितीची परवानगी द्या.*
■ नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी साऊंड वाजविण्याची परवानगी द्या.
■ मंडप डेकोरेशन युनियनची रास्त मागणी.
■ उपासमार किती दिवस चालणार.
*हिंगणघाट :-* मागील सात महिन्यांत लग्न, मुंज, स्वागत समारंभ, इतरही सोहळे उत्साहात साजरे करता आले नाही. पुढच्या महिन्यात येणारा जग्न माता अंबिके चा उत्सव तरी जल्लोषात साजरा करण्यासाठी लाऊड स्पिकर वाजवून मंडप टाकून साजरा करु द्या तसेच लग्नसमारंभात ५०० लोकांच्या उपस्थितीची परवानगी द्या. आम्ही किती दिवस उपासमार सहन करायची, असा सवाल जिल्हा भर कार्यरत मंडप डेकोरेशन युनियनने उपस्थित केला आहे.
…..यंदा मार्च महिन्यात लाकडाऊन सुरू झालं ते संपण्याची चिन्हे दिसत नाही. एका व्यावसायिका सोबत अनेक मजूर, कारागिर व तंत्रज्ञ मंडळी असते. त्या सर्वांचा उदरनिर्वाह या माध्यमातून चालतो. कोरोणाच्या उद्रेकामुळे सर्वांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे. पण, सरकार ढिम्मच आहे. शासनाने येत्या नवरात्र उत्सवाकरिता मंडप डेकोरेशन धंदेवाईक मंडळींना अनुमती देऊन असंख्य कुटुंबातील सदस्यांवरील उपासमार टाळावी, अशी मागणी करणारे निवेदन उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी मार्फत शासनाकडे रवाना केले आहे.
…..कोरोनाच्या प्रादुर्भावाने लोकडाऊनच्या कालखंडात मंडप डेकोरेशन, साऊंड, कॅटरिंग बिछायात या व्यवसाईकांवर तसेच कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. वर्धा जिल्ह्यातच नव्हे तर सर्व महाराष्ट्रातील मंडप डेकोरेशन, साऊंड, कॅटरिंग, बिछायतसह आदी व्यवसायातील मालक व कामगारांवर बेरोजगारीची पाळी आली आहे. परिणामी आमच्यावर व आमच्या कुटुंबावर खुप मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. आमचा व्यवसाय लग्न समारंभ व सणासुदीच्या भरवशावर चालत असतो व त्यावरच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो.
……पुढील महिन्यात नवरात्रीचा उत्सव येत आहे. या उत्सवामध्ये अनेक नवरात्र उत्सव मंडळ व भाविक नागरिक मंडप डेकोरेशन, साऊंड, लायटिंग इत्यादी लावण्याची मागणी करीत आहे. त्यामुळे आम्हाला नवरात्र उत्सवात मंडप डेकोरेशन, लायटिंग, साऊंड वाजविण्याची परवानगी दिली तर आम्ही आपणास निवेदनाव्दारे हमी देतो की, शासनाने दिलेल्या कोव्हीड-19 च्या नियमांचे पालन करू व कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊ तसेच नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होणाऱ्या लग्न समारंभाकरीता मंडप सभागृहात ५०० लोकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात द्यावी. त्यामुळे आमच्या व्यवसायाला चालना मिळेल व आमचा व्यवसाय पूर्वरत सुरू होऊन आमच्या व मजुरांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता दूर होईल. या आशयाचे निवेदन हिंगणघाट-समुद्रपूर तालुका मंडप डेकोरेशन, साऊंड, कॅटरिंग, बिछायात संघटनेचे अध्यक्ष जगदीश पिसे, उपाध्यक्ष राजू बैसवारे, सचिव अशोक तपासे, सहसचिव बाबाराव फुलकर, कोषाध्यक्ष दिलीप गंधारे, सदस्य प्रवीण खटी, सचिन बंगलवार, मयुर तपासे, बाबा उमाटे, निखिल मुळे, भिकमचंदजी तावरी, गजानन विटाळे, सुधीर दिवे यांनी मागणी केली आहे.