*हिंगणघाट कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर*
*हिंगणघाट: प्रशांत जगताप:* हिंगणघाट तालूक्यात कोरोना वायरस महामारीचा प्रकोप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दिवसाने दिवस कोरोना बांधीत रुग्णाच्या मृत्यूचे आलेख वाढत असल्याकारणाने जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे. साधी सर्दी खोकला झाला की कोरोना वायरसच्या नावावर डॉक्टर आम्हाला कोरोना रुग्णालयात टाकणार या भीतीमूळे सर्दी, ताप, खोकला असलेले रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी जात नसल्याचे दिसुन येते आहे.
*एकाच दिवशी 3 रूग्णचा मृत्यु*
हिंगणघाट शहरांमध्ये पाचशेच्या वर रुग्ण मीळुन आले. रोज नविन कोरोना बाधीत रुग्ण मिळत आहे. आज एका दिवसात 3 रुग्ण मृत्यु झाल्याने हिंगणघाट तालूक्यात कधी कोरोना रुग्णाच्या मृत्युचा स्फोट होईल अशी भीती लोकांनी व्यक्त केली आहे. काल हिंगणघाट तालूक्यात 18 कोरोना बाधित रुग्ण मिळाले. त्यात आता ग्रामीण भागातून पण कोरोना बाधित रुग्ण मीळत असल्याने पुढे काय होईल या काळजीने अनेकाचा थरकाप होत आहे.
*आरोग्य सेवाच व्हेन्टीलेटर*
कोरोना वायरसने बांधीत रुग्णाचा आकडा वाढत असल्यामुळे आरोग्य विभागावर मोठा तान पडत असल्यामुळे आरोग्य सेवाच व्हेन्टीलेटर वर असल्याचे दिसुन येते. रुग्णाला वळेवर उपचार मिळत नाही, ऑसीजनची बेडची कमतरता दिसून येत आहे.
*हिंगणघाट नगर पालिका कोमात*
कोरोना वायरसच्या सुरुवातीच्या काळात ऊत्तम नियोजन करणारी हिंगणघाट नगर पालिका आज कोमात गेल्याचे चित्र आहे. हिंगणघाटचे नगराध्यक्ष बिमार असल्यामुळे आणी जनतेसेवक म्हणुन निवडुन येणारे नगरसेवक कोरोना वायरसच्या उपायोजना बद्द्ल एक साधी मीटिंग घेत नाही तर असे जनप्रतिनिधि काय कामाचे असे प्रश्न विचारत आहे.
*जनप्रतिनिधि क्षेत्रात दिसेना*
जेव्हा पहिल्या लॉकडाउन मध्ये लोकांना गरज नसतांना मोठ्या प्रमाणात अन्न धान्य वाटण्यात पुढे दिसून आलेले जनप्रतिनिधि आज तालूक्यातील जनता त्रस्त असतांना, बेरोजगार असतांना कुठे दिसेनाशे झाले.