आता देशात फक्त आयएसआय पिव्हीसी पाईप विक्रीला परवानगी

56

आता देशात फक्त आयएसआय पिव्हीसी पाईप विक्रीला परवानगी

आता देशात फक्त आयएसआय पिव्हीसी पाईप विक्रीला परवानगी
आता देशात फक्त आयएसआय पिव्हीसी पाईप विक्रीला परवानगी

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
वर्धा २३/०९/२१
मानवी आरोग्य, जनावरं तसेच पर्यावरणाला घातक ठरत असलेल्या पिव्हीसी पाईपमध्ये लेड कंटेन टाकण्यास बंदी करण्यात आली असून आता आयएसआय ट्रेडमार्क असलेल्या पिव्हीसी पाईप विक्रीलाच केंद्र सरकारच्या हरित लवादने परवानगी दिली आहे. हा निर्णय १ ऑक्टोबरपासूनच लागू होणार असल्याने बहुतांश उद्योजकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे हा निर्णय लागू करण्यासाठी काही दिवस मुदत वाढ दे÷ण्यात यावी, अशी मागणी भारतीय मानक ब्युरोकडे करण्यात आली असल्याचे वर्धा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी कळवले आहे.
नागपूर येथे भारतीय मानक ब्युरोचे विभागीय प्रमुख विजय नितनवरे, अधिकारी सर्वेश त्रिवेदी, इशा खुराना यांनी विदर्भातील सर्व पिव्हीसी पाईप निर्मित्यांच्या बैठकीत आयएसआय ट्रेडमार्क असलेल्याच पाईप विक्रीची माहिती दिली. पिव्हीसी पाईपची निर्मिती करताना त्यामध्ये लेड कंटेन असल्यामुळे मानवी आरोग्यासह जनावरांसह पर्यावरणात मिश्रीत होऊन वृक्षांसाठी सुद्धा हानीकारक असल्याचे निष्पन्न झाल्याने पीव्हीसी पाईपमध्ये लेड कंटेन टाकण्यात बंदी केल्याने आयएसआय पिव्हीसी व युपीव्हीसी पाईप व फिटींग निर्माण करून विकावे लागणार आहे.
जे कोणी निर्माते व विक्रेते आयएसआय ट्रेडमार्क नसलेले पाईप विकेल त्यांच्यावर केंद्र सरकारच्या भारतीय मानक ब्युरोतर्फे कारवाही केली जाणार आहे. तसेच पिव्हीसी व यु पिव्हीसी पाईप निर्माण करताना काय सुधारणा केली व त्याची अमलबजावणी १ ऑक्टोबरपासून कशी करावी याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.