भाच्चा मामीला घेऊन दिड लाखांसह फूर्रर्रऽऽऽ

15

भाच्चा मामीला घेऊन दिड लाखांसह फूर्रर्रऽऽऽ

भाच्चा मामीला घेऊन दिड लाखांसह फूर्रर्रऽऽऽ
भाच्चा मामीला घेऊन दिड लाखांसह फूर्रर्रऽऽऽ

✒श्याम भुतडा✒
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005

केज —भाच्याने मामीला पळविल्याची घटना नांदूर घाट परिसरात घडली आहे. विशेष म्हणजे सदर महिलेने घरातील दिड लाख रुपयांसह सोन्याचे दागिणेही लंपास केले आहेत. नात्याला काळीमा फासणार्‍या या घटनेने केज तालुक्यात खळबळ उडाली आहे.
आगेवाडी येथील 36 वर्षीय महिला दि.18 सप्टेंबर रोजी संध्याकाळी आठ वाजता घरातील दीड लाख रुपये घेऊन पळून गेली.या महिलेस दहा वर्षाचा मुलगा तसेच बारा वर्षाची मुलगी आहे. अचानक पळून गेल्यामुळे तिचा पती महिलेचे आई वडील तसेच इतर नातेवाईकांनी सर्व ठिकाणी शोध घेतला परंतु कुठेच ती सापडली नाही, तिचा पती हा ट्रॅक्टर ड्रायव्हर असून आठ दिवसापूर्वी कारखान्याची दीड लाख रुपये उचल घेतली होती ते पैसे त्या महिलेजवळ होते घराचे काम करायचे होते म्हणून बँकेमध्ये टाकले नाही.हे पैसे घरात आहेत की नाहीत हे पाहिले असता घरातील पैसे दीड लाख तसेच गंठण मनी मंगळसूत्र सर्व साहित्य घेऊन तिने पलायन केल्याचे निदर्शनास आले, यावर दि. 20 रोजी पोलीस स्टेशन केज याठिकाणी पतीच्या खबरेवरून मिसिंगची तक्रार नोंदवण्यात आली व याचा तपास नांदुरघाट चौकीचे जमादार जयवंत शेप यांच्याकडे सोपवण्यात आला. दोन दिवसाची शोधाशोध घेतल्यानंतर गावांमध्येच त्या महिलेच्या पतीचा भाचा जो परभणी येथे अ‍ॅग्री करत आहे, त्यानेच त्या महिलेला पळवून नेले आहे असा आरोप सदर महिलेच्या पतीने तसेच नातेवाइकांनी केला आहे. कारण दि. 18 रोजी तो भाचा गावात आला होता, मित्राची दुचाकी घेऊन रात्री आठ-साडे आठ वाजता परभणीच्या दिशेने गेला व दुचाकी केज बस स्टँडवर लावून गेला दोन दिवसांनी त्या ठिकाणाहून मोटर सायकल आणली, तसेच दि. 18 पासून त्या भाच्याचा मोबाईल बंद आहे, वेळोवेळी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क झाला नाही काही मित्राच्या सांगण्यावरून तो भाच्चा आणि सदर महिला हे परभणी याठिकाणी असल्याचे सांगण्यात आले त्या महिलेचे आई-वडील भाऊ हे परभणी या ठिकाणी शोध घेत आहेत. परंतु आणखी ते सापडले नाहीत ज्या मामाने भाचा शिकावा म्हणून लहानपणापासून सांभाळले शिक्षणासाठी पैसे खर्च केले आणि लेकरासारखे सांभाळले त्याच मामाची बायको पळविल्याचा आरोप केला गेला आहे. त्या महिलेचे वय 35 वर्षे आहे तर पळविणार्‍याचे वय 25 वर्षे आहे त्याने हे कृत्य केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे पोलीस तपास करत असून या लैला मजनूचा शोध घेत आहेत