बोरगाव बु येथील अनेक परिवार प्रधानमंत्री घरकुल योजने पासून वंचित.
ग्रामपंचायत बोरगाव येथील प्रपत्र ड यादीतून लाभार्थ्याचे नाव वगळण्यात आल्यामुळे खंडविकास अधिकाऱ्यांना नागरिकानी दिले निवेदन.

ग्रामपंचायत बोरगाव येथील प्रपत्र ड यादीतून लाभार्थ्याचे नाव वगळण्यात आल्यामुळे खंडविकास अधिकाऱ्यांना नागरिकानी दिले निवेदन.
✒ युवराज मेश्राम✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपुर:- नागपुर जिल्हातील कळमेश्वर तालुक्यातील दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरगाव बुद्रुक येथे प्रशासनाच्या आडमुठी कारभारामुळे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेपासुन वंचित राहण्याची वेळ आली आहे. प्रधानमंत्री यांच्या महत्वकांशी घरकुल आवास योजनेचा बोजबारा वाजला आहे.
पंचायत समिती अंतर्गत प्रधानमंत्री घरकुल आवास योजना प्रपत्र ड यादीमध्ये ग्रामपंचायतीने पंचायत समिती स्तरावरून झालेल्या संरक्षणात गावातील 63 लाभार्थ्यांची नावे ग्रामपंचायत मार्फत पंचायत समिती स्तरावर पाठविण्यात आले होते. झालेल्या घटना नुसार पंचायत समिती स्तरावरून 36 लाभार्थ्याचे मंजूर यादी ग्रामपंचायत प्राप्त झालेली होती. परंतु येत्या पंधरा दिवसापूर्वी ग्रामपंचायत पुनच्छ प्रपत्र ड प्राप्त यादी व पात्र असे वर्गीकरण करून लाभारत्याची यादी प्राप्त झाले आहे. यामध्ये फक्त चार लाभार्थी यांनाच प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत पात्र
ठरविण्यात आले उर्वरित 32 लाभार्थीना यातुन वगळण्यात आले आहे.
ज्या नागरिकांन कडे दुचाकी मोटरसायकल, लँडलाईन फोन, दोन रूम घर आगे त्याना या घरकुल योजनेत अपात्र ठरविण्यात आले. प्रत्यक्ष मात्र त्यांच्याकडे घर, दुचाकी किंवा लँडलाईन फोन नाही यामुळे कोणते लाभार्थी अपात्र ठरू शकत नाही त्यासाठी सर्व लाभार्थ्यांना प्रपत्र यादीतून समावेश करावा जेणेकरून त्यांना घरकुलांचा लाभ देण्यात यावा अशी मागणी नागपूर जिल्हा ओबीसी भाजपा आघाडीचे अध्यक्ष प्रकाश टेकाळे, लक्ष्मन थोटे, तेजराम टेकाळे यांच्या नेतृत्वात बोरगाव वासियांनी खंडविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात लाभार्थ्यांमध्ये रामचंद भक्ते, हनुमान पानपत्ते, देवराव टेकाडे, सिताराम काळबांडे, युवराज वानखेडे, पंचफुला राऊत, संगीता टेकाडे, चिरकुट कोल्हे, यशोदा कोल्हे, मीना जपुळकर, गुलाब कोल्हे, उमाजी कुले, शकुंतला गुडघे, श्रावण कोल्हे, इंदिरा पाटील, देवकाबाई खेकडे, मिराबाई भक्ते, सचिन कुंभारे, विमल टेकाटे प्रामुख्याने उपस्थित होते.