घुग्घुस नगरपरिषद कार्यालयातर्फे बॅनर, पोस्टर काढण्याची मोहीम

पंकज रामटेके
घुग्घुस प्रतिनिधी
मो.८४८४९८८३५५
गुरवार 23 सप्टेंबर रोजी घुग्घुस नगरपरिषद कार्यालयातर्फे घुग्घुस शहरातील विना परवानगीने लावण्यात आलेले बॅनर, पोस्टर काढण्याची मोहीम राबविण्यात आली.
गांधी चौक, बसस्थानक चौक, राजीव रतन चौक व इतर ठिकाणी विना परवानगीने लावण्यात आलेले राजकीय पक्षाचे बॅनर, पोस्टर व इतर बॅनर, पोस्टर काढण्यात आले.
घुग्घुस नगर परिषद अंतर्गत दिनांक 21 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या कालावधीत श्रमदान व स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे त्याअनुषंगाने ही मोहीम राबविण्यात आली.
घुग्घुस ग्रामपंचायत अस्तित्वात असतांना शहरात मोठ्या प्रमाणात बॅनर, पोस्टर लावण्यात आले होते परंतु आता घुग्घुस नगर परिषदेची स्थापना झाली आहे, त्यामुळे घुग्घुस नगर परिषदेच्या विना परवानगीने लावलेले बॅनर, पोस्टर काढण्यात आलेले आहे.
यावेळी घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्शीया जुही व नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.