घुग्घुस नगरपरिषद कार्यालयातर्फे स्वच्छता व श्रमदान मोहीम

पंकज रामटेके
घुग्घुस प्रतिनिधी मो.८४८४९८८३५५.
घुग्गुस : -नागरिकांनी सहभागी होण्याचे मुख्याधिकारी आर्शिया जुही यांचे आवाहन* घुग्गुस नगरपरिषद कार्यालयांतर्गत २१ते२४ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. घुग्घुस शहरात स्वच्छता व श्रमदान कार्यक्रम २१ सप्टेंबर सकाळी ९ वाजता राबविण्यात आला. नगर परिषद कार्यालय ते पोलीस स्टेशन पर्यंत मोहीम राबविण्यात आली. मुख्याधिकारी आर्शिया जुही यांनी भाजीपाला विक्रेत्यांना कचराकुंडीचे वाटप केले व त्यात कचरा गोळा करण्यात सांगितले. यावेळी आर्शिया जुही यांच्यासह नगर परिषद कर्मचारी विठोबा झाडे,सुरज जंगम, हरी जोगी,दिनेश बावणे,अशोक रसाळ,शंकर पचारे,मोसीम कुरेशी,सुप्रिया खोब्रागडे,गिरीश बोंन्डे उपस्थित होते. शहरातील विना परवानगी लावण्यात आलेले बॅनर पोस्टर काढण्याची विशेष मोहीम २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून राबविण्यात येणार आहे शहरात प्लॅस्टिक बंदीबाबताची मोहीम २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून राबविण्यात येणार आहे. इच्छुक नागरिकांनी स्वच्छता व श्रमदान मोहीम राबविणे कार्यक्रमास सहभागी होऊन नगर परिषदेला सहकार्य करावे.असे आवाहन मुख्याधिकारी आर्शिया जुही यांनी केले होते.