जालन्यात मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या मागावर चोरांची नजर

17

जालन्यात मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या मागावर चोरांची नजर

जालन्यात मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या मागावर चोरांची नजर
जालन्यात मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या मागावर चोरांची नजर

सतीश म्हस्के
जालना जिल्हा प्रतिनिधी
9765229010

जालना तालुक्यांतील निरखेडा शिवारातील स्काँर्पीओ वाहनातून जनावरे चोरी करणार्‍या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिस व गावकरी गेले असता, अंधाराचा फायदा घेऊन वाहन तेथेच सोडून आरोपींनी पळ काढला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सिल्लोड येथून दोन आरोपींना जेरबंद केले असून या आरोपींकडून ईतर गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे, जालना तालुक्यांतील भिलपुरी येथील प्रकाश गोरे या शेतकऱ्याने त्यांच्या गोठ्यातुन दोन गायी चोरीला गेल्याची फिर्याद 15 सप्टेंबर रोजी मौजपुरी पोलिसांना दिली होती, तपासात पोलिसांना निरखेडा शिवारात स्काँर्पीओ चिखलात फसल्याने आरोपी पोलिस व गावकर्‍यांना पाहून व अंधाराचा फायदा घेत पळून गेले होते, त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू करण्यात आल्यावर सिल्लोड येथील जावेद शब्बीर पटेल, व मोहमद कुरबान मो अजीज अन्सारी हे दोन आरोपी जनावरे चोरी प्रकरणात सहभागी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी जनावरे चोरीची कबूली दिली पोलिसांनी त्यांना अटक केली असून, आरोपींकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.