कलोडे चौकात एका व्यक्तीला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट दि.22 सप्टेंबर रात्री 9.40 दरम्यान एक अनोळखी व्यक्ती दारू पिऊन डोलत जात असताना अपघात नाही झाला पाहिजे म्हणून दोन व्यक्तींनी त्याला रोडच्या बाजूला नेऊन ठेवले असता तो झोपी गेला, या संधीचा फायदा घेत आरोपी राजीव उर्फ मिरची दुरबुडे राहणार कलोडे चौक हिंगणघाट याने या व्यक्तीचे खिशे तपासले असता त्याला त्याच्या खिशात काही रुपये दिसले नाही. त्याच वेळी त्या व्यक्तीला जाग आला व शिवीगाळ केली त्यामुळे आरोपी राजीव उर्फ मिरची याने दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला असे आरोपी ने सांगितले सदर प्रकरणात आरोपी वर कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटणकर करीत आहे.