महावितरणच्या लाईनमन कडुन ग्राहकाची आर्थिक लुट मिटर न लावताच बिल मात्र घरपोच

14

महावितरणच्या लाईनमन कडुन ग्राहकाची आर्थिक लुट मिटर न लावताच बिल मात्र घरपोच

महावितरणच्या लाईनमन कडुन ग्राहकाची आर्थिक लुट मिटर न लावताच बिल मात्र घरपोच
महावितरणच्या लाईनमन कडुन ग्राहकाची आर्थिक लुट मिटर न लावताच बिल मात्र घरपोच

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

राजुरा तालुका ,सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे विद्युत मीटर न लागता वीज बिलािच घरपोच सेवा
राजुरा अंतर्गत येणार्या कापनगाव येथील श्रीकृष्ण नामदेव निवलकर या ग्राहकाला ४-५ महिन्यापासून मिटर निघूनही लाईनमन राकेश येमुलवार याना ग्राहकांनी पैसे न दिल्यामुळे मिटर लावलेच नाही पन महावितरण कंपनीने विज बिल मात्र घरपोच वेळेत पाठविले, तसेच आर्वी येथील संजय चिलमुले यांच्याकडे १३,००० हजार रुपये थकित होते म्हणून त्यांचा मिटर काढून कार्यालयात जमा करण्यात आला, नतंर संजय चिलमुले यांनी १३,००० हजार व त्यावरील व्याज व पि. डि चार्ज भरले व मीटर लावून द्या म्हणाले परंतु सबंधित अधिकारी त्याना नविन कागदपत्र तयार करून कार्यालयास सादर करण्यास सांगितले, व तसा अर्ज संजय चिलमुले यानी कार्यालयास सादर केला परंतु ६-७ महिने लोटूनही राकेश येमुलवार यांनी सर्वे दिला नाहि म्हणुन त्यांचे डिमांड मिळालेच नाही, तसे लाईनमनला विचारले असता, त्यानी किति पैसे देता असे स्पष्ट ग्राहकास म्हटले, त्यामुळे लाईनमन राकेश येमुलवार हे आपल्या कामात कसूरवान दिसत असून ग्राहकांना जाणीवपूर्वक त्रास देणे आपल्या कामात दिरगांई करणे असे अनेक प्रकार त्यांच्या बाबतीत उघडकीस आले,
आज दिनांक २२-९-२०२१ रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद राजुरा च्या वतीने महावितरण कंपनीचे उपविभागीय कार्यकारी अभियंता यांना पैश्याची मागणी करणे ग्राहकांना जाणीवपूर्वक त्रास देणे या सर्व बाबींचा आढावा घेऊन चर्चा करण्यात आली, तसेच संबधित कर्मचारी राकेश येमुलवार यांना तात्काळ निलंबित करून कंपनीच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी अशे निवेदन देण्यात आले
दोन ते तीन दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा हि देण्यात आला
निवेदन देताना अ. भा. आ. वि परीषदेचे विदर्भ सचिव महिपालजि मडावी, तालुका सचिव दिपक मडावी, जिल्हा उपाध्यक्ष नितीन सीडाम, रवि आत्राम उप तालुका प्रमुख हे उपस्थित होते