आमदार राजेंद्र पाटणी यांच्या शुभ हस्ते दोनद येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍️
🪀8554920002🪀
कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री. राजेंद्रजी पाटणी साहेब यांच्या शुभ हस्ते तालुक्यातील दोनद बु येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी सर्वश्री भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे, सरपंच इंझा तथा भाजपा सरचिटणीस संकेत नाखले, दोनद बु सरपंच निरंजन पाटील करडे, भाजपा युवामोर्चा तालुका अध्यक्ष मंगेश धाने, पंस सदस्य शुभम बोनके, उपसरपंच सुरेश गुल्हाने, रमेशराव पोले, श्रीराम उरकडे, रामराव डुकरे, विष्णू उघडे, बंडू पाटील पोले, मा किशोर पाटील राऊत, गजानन हांडे, रत्नाकर बिहाडे, बबनराव, भेंडेकर, शंकरराव राऊत, शुध्धोनराव गवई, गजानन कडू, माणिकराव राऊत, अरविंदा राऊत, पांडुरंग काष्टे, किशोर सवाई, समाधान डांगे, गजानन ढोकने, एकनाथ सईकर, विजयराव वाघमारे, अशोकराव गवई, अशोक ढवक, ईत्यादीसह अन्य मान्यवर उपस्थितांचे आभार मानत सरपंच निरंजन करडे यांनी आपल्या प्रास्ताविकात आमदार महोदयांकडे निधीची मागणी केली.
ग्रामपंचायत दोनद बु वतीने जनसुविधा विकास कार्यक्रम, जि .प वाशिम अंतर्गत बैरिनाथ मंदीर ते डी पी पर्यंत काँक्रिट रस्त्याचे काम अंदाजीत किंमत 5 लक्ष रुपये, 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय ते मतांगपुरा नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत 2 लक्ष 71 हजार रुपये,रामराव डुकरे यांच्या घरापासून डी पी पर्यंत नाली बांधकाम 1 लक्ष 74 हजार, महादेव मुळे यांच्या गोठयापासून सुधाकर राऊत यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम अंदाजित किंमत 44 हजार, आठवडी बाजार जागेला तार कंपाउंड करणे अंदाजित किंमत 3 लक्ष रुपये, दलित वस्तीत पाईप लाईन व टाकी बसविणे अंदाजीत किंमत 1 लक्ष 83 हजार रुपये, नवीन वस्तीत पाईप लाईन व टाकी बसविणे अंदाजित किंमत 1 लक्ष एकोणसाठ हजार, संतोष राऊत यांचे घरासमोर बोरवर पाईप लाईन, मोटर, टाकी बसविणे अंदाजित किंमत 1 लक्ष 11 हजार,अण्णाभाऊ साठे सभागृहाला तार कंपाउंड करणे अंदाजित किंमत 1 लक्ष 63हजार, अण्णाभाऊ साठे सभागृहात स्टाईल बसविणे अंदाजित किंमत 60 हजार, दलीतवस्ती सभागृहाभोवती पेवर ब्लॉक बसविणे अंदाजीत किंमत 1 लक्ष 50 हजार, व्यायाम शाळेला फरसी बसविणे अंदाजित किंमत अंदाजित किंमत 50 हजार, ग्राम पंचायत जवळकाँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत 1 लक्ष 24 हजार रुपये.
असे एकंदरीत 13 कामांचे अंदाजित सर्व मिळून किंमत 24 लक्ष 75 हजार रुपये कामांचे यावेळी भूमिपूजन आमदार राजेंद्रजी पाटणी व उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
ग्राम पंचायत सदस्य सर्वश्री भीमराव पाटील,उमेश राऊत,सौ. छायाताई पाठे,सौ अलकाताई उघडे,पंचफुलाबाई के कान ईत्यादिंनी कार्यक्रमास उपस्थीत राहण्याची नागरिकांना विनंती केली होती. कार्यक्रम प्रसंगी प्रास्तविक सरपंच निरंजन करडे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन पंकज करडे यांनी केले असे संजय भेंडे भाजपा प्रसिद्धी प्रमुख तथा आमदार पाटणी यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले. कार्यक्रमात नाम फलकाचे विविध ठिकाणी अनावरण करण्यात आले. ✍️