दुचाकी परवाना नियमात बदल

दुचाकी परवाना नियमात बदल

दुचाकी परवाना नियमात बदल

🖋 अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

📱 8830857351

 

नवी दिल्ली- 23-Sep-2022

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्रांशी संबंधित एक नवीन नियम लागू केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी झाल्याने दुचाकी चालकांना परवाना काढण्यासाठी वाहन चालविण्याची चाचणी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा न देता परवाना बनवण्याचा नियम होता. त्यात सुधारणा करण्यात आली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार देशभरात मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्रे उघडली जात आहेत. यामध्ये प्रशिक्षणार्थींना सिम्युलेटरवरून वाहन चालवायला शिकवले जाईल. प्रशिक्षण घेतल्यानंतर केंद्र प्रशिक्षणार्थीला प्रमाणपत्र देईल. या प्रमाणपत्राच्या आधारे आरटीओ कार्यालयात परवाना काढता येतो. म्हणजेच येथून प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तीला आरटीओ कार्यालयात चाचणी देण्याची गरज भासणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here