धक्कादायक….. चंद्रपूरचे प्रसिद्ध उद्योगपती उमाकांत मामीडवार यांचा विहिरीत पडून मृत्यू • मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यातच

53
धक्कादायक..... चंद्रपूरचे प्रसिद्ध उद्योगपती उमाकांत मामीडवार यांचा विहिरीत पडून मृत्यू • मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यातच

धक्कादायक…..
चंद्रपूरचे प्रसिद्ध उद्योगपती उमाकांत मामीडवार यांचा विहिरीत पडून मृत्यू

• मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यातच

धक्कादायक..... चंद्रपूरचे प्रसिद्ध उद्योगपती उमाकांत मामीडवार यांचा विहिरीत पडून मृत्यू • मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यातच

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर : 23 सप्टेंबर
येथील प्रसिद्ध उद्योगपती उमाकांत मामीडवार हे मागील दोन दिवसापासून घरून निघून गेले होते. या संदर्भाची तक्रारही रामनगर पोलीस स्टेशन येथे देण्यात आली होती. शनिवार 22 सप्टेंबर च्या रात्री दाताळा येथील खपती महाराज मंदिराच्या विहिरीत त्यांचे प्रेत सापडले एकच खळबळ उडाली आहे.
उमाकांत मामीडवार, वय वर्ष ८७, सडपातळ बांधा, उंची ५.३”, अंगावर सफारी ड्रेस, राहणार गजानन मंदिर वॉर्ड, चंद्रपूर. हे गृहस्थ संध्याकाळी ४.१५ वाजता घरून निघून गेले होते. त्यांचे मृत शरीर शासकीय रुग्णालयात आणले असून रामनगर पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
प्रसिद्ध कंत्राटदार जयंत मामीडवार, विवेक मामीडवार यांचे ते वडील असून त्यांच्या मृत्यूने मामीडवार कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहेत. उमाकांत मामीडवार यांनी आपली जीवन यात्रा संपवली की पुन्हा काही घातपात असू शकतो यावर शहरात चर्चा सुरू आहे.