हिरवा देव उत्सव समिती तर्फे हिरवा देवाची स्थापना
सौरभ कामडी
मोखाडा प्रतिनिधी
दि:23: खोडाळा विभागात हिरवा देवाची स्थापना करणारे हे दुसरे वर्ष आहे याही वर्षी साध्या सोप्या पद्धतीने हिरव्या देवाची स्थापना खोडाळा शहारात सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांच्या घरी करण्यात आली आहे यातून आदिवासी समाजाला आपली संस्कृति व चालिरीति रिवाज,आदिम इतिहास आदिवासी दैवता माहिती व्हावे व येणाऱ्या पुढील पिढीला ही त्या अवगत व्हावे व आपली संस्कृती जतन करणे या उदेशाने खोडाला शहरात आदिवासी हिरवा देव उत्सव समिती तर्फे सार्वजनिक हिरवा देव बसवण्यात आला आहे या पाच दिवसाच्या सोहळ्यात अनेक सामाजिक क्षेत्रातील नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीनि दर्शन घेतले
यातून नैसर्गिक रित्या डेकोरेशन बनवले होते त्यात आदिवासी दैवताचे दर्शन म्हणजे कंनसरी,डोगर्या देव,वाघोबा,हिरवा वं काही आदिवासी शेतकऱ्याची हत्यारे याचा ही समावेश यात करण्यात आला आहे ,
सदर हिरवा देव उत्सव समितीचे अध्यक्ष मा.जनार्दन पाटील व सचिव नवसू हमरे यांच्या नेतृत्वाखाली या उत्सवाचे सर्व नियोजन पार पाडले आहे.