रिपब्लिकन पक्षाचे (खोरिपा) राज्यस्तरीय अधिवेशन मंगळवारी ब्रह्मपूरी येथे आयोजित
मीडियावार्ता, दी:२३: (मुंबई) माजी आमदार मा उपेन्द्र शेंडे यांच्या अध्यक्षतेखालील रिपब्लिकन पक्षाचे (खोरिपा) राज्यस्तरीय अधिवेशन ब्रह्मपूरी येथे जिल्हा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे
सकाळी ९- ३० वा आंध्रप्रदेश राज्याचे अध्यक्ष मा महेशबाबू यांच्या हस्ते निळा झेंडा अनावरण करण्यात येणार आहे त्यानंतर सकाळी ११-०० वा देशातील सध्य स्थितीवर चर्चा करण्यात येणार आहेत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ह्या चर्चासत्रात रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रा डॉ देवेश कांबळे, राष्ट्रीय संघटक मा उत्तमराव गवई, प्रवक्ते मा डॉ एन व्हि ढोके, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मा प्रशिक आनंद व प्रा डॉ सिद्धार्थ मेश्राम आदी मान्यवर सहभागी होणार आहेत
पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने देशातील सरकारी उद्योग विकले, बेरोजगारी , महागाई वाढली, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय अस्थिरता निर्माण करण्यात आली आहे देशात हुकुमशाही आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जात आहे
खाजगीकरणाच्या , कंत्राटीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे शैक्षणिक क्षेत्रात खाजगीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे ह्या विरोधात लढण्याची ताकद रिपब्लिकन पक्षात आहे
रिपब्लिकन पक्षाचे (खोरिपा)अध्यक्ष मा आमदार उपेन्द्र शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी ४-०० वा होणार्या खुल्या अधिवेशनात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा देशक गिरीशबाबू खोब्रागडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा डॉ गोपीचंद मेश्राम, राष्ट्रीय संघटक मा उत्तमराव गवई, प्रवक्ते मा डॉ एन व्हि ढोके, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा भाऊ निरभवणे ,मध्य प्रदेश अध्यक्ष मा रामबिहारी शुक्ला, छत्तीसगड अध्यक्ष मा ओमप्रकाश मेश्राम छत्तीसगड महिला आघाडीच्या अध्यक्षा मा सिमा गेडाम,मा प्रतिभा वासनिक, तामिळनाडू अध्यक्ष मा के पी सुंदरप्रथबन , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा जीवन बागडे, चिटणीस प्रा अशोक ढोले उपाध्यक्ष मा नानासाहेब देशमुख, चरणदास रामटेके,नंदकुमार रोकडे,चंद्रकांत घोडके विदर्भ प्रदेश अध्यक्ष मा सी पी रामटेके, सरचिटणीस ध्रुव करमरकर, विदर्भ प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा मा संघमित्रा खोब्रागडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष मा भागवत कांबळे , सरचिटणीस विक्रांत पाटील, मराठवाडा अध्यक्ष मा संजीवकुमार ईखारे, अकोला जिल्हा अध्यक्ष मा दिगंबर वाकोडे, अमरावती जिल्हा अध्यक्ष एड मा दिलीप घरडे, नागपूर प्रदेश अध्यक्ष मा राजू गजभिये, भंडारा जिल्हा अध्यक्ष मा अजय वासनिक, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष मा माणिकराव तुर्रे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मा मनोहर भिडे, जळगाव जिल्हा अध्यक्ष मा भगवान मेढे, धुळे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष मा वाल्मिकराव येलेकर,नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष मा मुकेश शिंदे, ठाणे जिल्हा अध्यक्ष मा भाई भोसले, नांदेड जिल्हा अध्यक्ष मा अरुण कांबळे तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांतील पक्षाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी ,कार्यकर्ते ,जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पक्षाचे मुंबई प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी दिली आहे