पांगरी येथे खासदार राजाभाऊ वाजे यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न

12

पांगरी येथे खासदार राजाभाऊ वाजे यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न

ज्ञानेश्वर तूपसुंदर नाशिक प्रतिनिधी
मो. 8668413946

नाशिक │ पांगरी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने खासदार राजाभाऊ वाजे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिंदखेड राजा येथील शिवाजीराव जाधव होते.

मराठा आंदोलनाला जाहीर पाठिंबा देणाऱ्या खासदार वाजे यांचा सत्कार शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच स्मिता निकम, विलास पांगारकर, गोविंद लोखंडे, भिकन शेळके, गणेश शिंदे, विजया पगार, विजय काकडे, अण्णासाहेब खाडे, विठ्ठल राजे उगले, विनायक तांबे, भारत कोकाटे, कैलास निरगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना विलास पांगारकर म्हणाले की, “समाजाच्या विकासासाठी आणि ग्रामीण भागातील दुष्काळ समस्येवर नेतृत्व करण्याची संधी राजाभाऊंना मिळाली असून, समाजाचं देणं लागते म्हणून ते नेहमी सेवकभावाने कार्यरत आहेत.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष पगार यांनी केले. पांगारकर यांनी आभार मानले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी बाबासाहेब पगार, संपत पगार, वसंत पगार, रमेश पांगरकर, आत्माराम पगार, बंडू पगार, प्रकाश पांगरकर, नंदू मालपाणी, रभाजी पगार, विठ्ठल पगार, चंद्रभान दळवी, माणिक देवरे आदींनी विशेष सहकार्य केले.