रायगड मध्ये ५०हजार कुटुंब नळ जोडणी पासून वंचित

15

रायगड मध्ये ५०हजार कुटुंब नळ जोडणी पासून वंचित

जलजीवन मिशन अंतर्गत पाच लाख कुटुंबांना नळ कनेक्शन

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून रायगड जिल्ह्यातील ५ लाख ४८ हजार ६२० कुटुंबापैकी ४ लाख ९८ हजार ६२८ कुटुंबाना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. या कुटुंबियांना नळद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.तर रायगड जिल्ह्यातील सुमारे ५०हजार कुटुंब नळ जोडणी पासून वंचित आहेत.

१५ तालुक्यांपैकी विशेष म्हणजे ३ तालुके खालापूर म्हसळा आणि उरण ह्या तीन तालुक्यात १०० टक्के नळ जोडणी झाली आहे.
केंद्र सरकार कडूंन जल जीवन योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक घरात नळ द्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यात ज्या घरामध्ये नळ कनेक्शन आहे त्या घरांची माहिती संकलित करण्यात आली . त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ज्या घरांमध्ये वैयक्तिक नळ कनेक्शन नाही अशा घरांना नळ कनेक्शन देण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यात ९१ टक्के कुटुंबियांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात जलजीवन योजना यशस्वी कारण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून योजना प्रभावीपणे राबविली जात आहे.
नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे तसेच गावातील महिलांना त्रास कमी व्हावा या साठी केंद्र सरकार मार्फत, जलजीवन मिशन हि योजना राबविण्यात येत आहे. योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणशी ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता अपेक्षित आहे.

तालुका एकूण घरांची संख्या झालेल्या घरगुती नळ जोडणीची संख्या नळ जोडणीची टक्केवारी शिल्लक जोडणीची संख्या
अलिबाग ७१३६४ ५७६५६ ८०.७९ १३७०८
कर्जत ५४५०९ ४९१७८ ९०. ९२ ५३३१
खालापूर ३६०४७ ३६०४७ १००.०० ००
महाड ४२४९९ ३८०५७ ८९.५५ ४४४२
माणगाव ४२१०४ ३८०५७ ८९.५५ १३९८
म्हसळा १४५६५ १४५६५ १००.०० ००
मुरुड १६४२३ १५४४० ९४.०१ ९८३
पनवेल ८१८३० ७६७३० ९३.७७ ५१००
पेण ४५०६७ ३५१८८ ७८.०८ ९८७९
पोलादपूर १६५०३ १४१३९ ८५.६८ २३६४
रोहा ४२६७० ३८६२२ ९०.५१ ४०४८
श्रीवर्धन २१३८३ २०५६५ ९६.१७ ८१८
सुधागड १५८६५ १४२२२ ८९.६४ १६४३
तळा ११४९१ ११२१३ ९७.५८ २७८
उरण ३६३०० ३६३०० १००. ०० ००
————————————————————–
एकूण ५४८६२० ४९८६२८ ९०.८९ ४९९९२