एक लाख चौरस फूट जागेत वंदे मातरम् उद्यान साकारले जाणार

16

एक लाख चौरस फूट जागेत वंदे मातरम् उद्यान साकारले जाणार

✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो. 9373959098

नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एम्प्रेस मिल परिसरात एक लाख चौरस फूट जागेत वंदे मातरम् उद्यान साकारले जाणार आहे. या वैशिष्ट्यपूर्ण उद्यानाची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी (ता.२२) पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्यासह उपायुक्त श्री. गणेश राठोड, कार्यकारी अभियंता श्री. कमलेश चव्हाण, कार्यकारी अभियंता श्री. गिरीश लिखार, श्री. राजेंद्र राठोड, श्री. प्रशांत सोनकुसळे, उद्यान संवर्धक श्री. अमोल चौरपागार, उपअभियंता श्री संजय इंगळे, पुरूषोत्तम फाळके, वंजारी, कनिष्ठ अभियंता श्री संजय पुरी, वस्तू शिल्पकार श्री. प्रियदर्शन नागपूरकर, श्री स्वप्नील आष्टीकर, श्री. अजय गौर, श्री अविनाश शाहू, श्री शिशिर त्रिपाठी आदी उपस्थित होते.