नुसता निवेदनाचा महापूर, पंचनामे लटकले निकषात.

60

नुसता निवेदनाचा महापूर, पंचनामे लटकले निकषात.

विनायक सुर्वे प्रतिनिधी

वाशिम;- मागील हप्त्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोयाबीन पिकाचा अतोनात नुकसान झाले आहे. मात्र नुकसानीचे पंचनामे शासनदेशाच्या अटीत लटकले आहेत. बऱ्याच संघटना पक्ष आणि लोकप्रतिनिधी पंचनामे करा असे निवेदनाचे सोपस्कार पार पडत असून. शासनादेशाच्या अटी शिथिल करण्याचे मात्र पुढाकार घेताना दिसत नाही.

परतीच्या पावसाने वाशिम जिल्ह्यात ढगाच्या कडकडाटात व विजेचा लखलखाट करत धो-धो बरसला आणि शेतकऱ्याचा संसार उध्वस्त करून निघून गेला. वर्षभर राब राब राबून पिकवलेल्या सोन्यासारखा सोयाबीन मातीत मिसळून गेल. वर्षभर केलेली मेहनत पाण्यात गेल्याने जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीत शासनाने मदत करणे अपेक्षित असताना पंचनाम्याच्या आदेशात 13 मे 2015 च्या शासनादेशाच्या निकषानुसार पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.

या निकषानुसार 65 मिलिमीटर पाऊस झाला तरच पूर व अतिवृष्टीच्या निकषात मदतीचा प्रस्ताव पात्र ठरू शकतो. मात्र जिल्ह्यात 40 मिलिमीटर पाऊस असल्याने प्रशासनासमोर पंचनामे कसे करावे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या परिस्थितीत तत्कालीन भाजप सरकारने काढलेला शासनादेशाच्या विद्यमान परिस्थितीत गैरलागू ठरत आहे. जिल्ह्यात 65 मिलिमीटरपेक्षा पाऊस झाला नसला तरी सतत धार पावसामुळे अतिवृष्टी त्यापेक्षा पेक्षा जास्त नुकसान झाले आहे प्रशासनाकडे आदेश आले आहेत परंतु निकषात बसत नसल्याने पंचनामे थांबलेले आहेत. आठ-दहा दिवसानंतर पंचनामा च्या करायला सुरुवात झाली तर पंचनामे करणार असा तिला निर्माण होऊन शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती आहे
लोकप्रतिनिधींनी यावर पर्यायी मार्ग काढावा व शेतकऱ्याला झालेल्या अतोनात नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे