वर्दीतील स्त्रीशक्ती : पोलीस कर्मचारी संगीता ढोले सन्मान.


विनायक सुर्वे प्रतिनिधी
वाशिम:- कोरोनाच्या लढ्यात आमच्या पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले आहे.त्या  स्त्री शक्तीचा सन्मान व गौरव करण्यात आला

भक्ती-शक्ती व कृषी संस्कृतीचे प्रतीक असणारे नवरात्रीचे मंगल पर्व सुरु असताना महाराष्ट्र पोलीस दलातील स्त्रीशक्तीच्या कार्याचा यथोचित गौरव करणे मला गरजेचे वाटते.महाराष्ट्र पोलीस दलामध्ये स्त्रीशक्ती अनेक प्रकारे समाजाप्रती आपली बांधिलकी जपत आहेत. असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

वाशिम पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या संगीता ढोले महिला पोलीस कर्मचारी या सामाजिक जाणिवेतून भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांना मोफत ज्ञानदानाचे काम करत आहेत. भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कर्तव्यापलीकडे जाऊन ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या ढोले यांचा पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला अभिमान आहे असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचार व्यक्त केला.

नवरात्र उत्सवाचे पवित्र पर्व सुरु असताना महाराष्ट्र पोलीस दलातील असामान्य कार्य करणाऱ्या स्त्री शक्तीची ओळख करुन देत असताना मला मनस्वी आनंद होत आहे. असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here