*भंगाराम तळोधी येथे शिक्षण परिषद संपन्न*
*परिषदेत कोरोणा योद्धा म्हणून जिल्हा परिषद सदस्या वैष्णवी अमर बोडलावर यांचा सत्कार*

*परिषदेत कोरोणा योद्धा म्हणून जिल्हा परिषद सदस्या वैष्णवी अमर बोडलावर यांचा सत्कार*
राजेंद्र झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी : भंगाराम तळोधी येथे जि.प. चंद्रपूर,बीट भंगाराम तळोधी, पंचायत समिती गोंडपिपरी व
केंद्र भंगाराम तळोधी / विठ्ठलवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण परिषद काल दिनांक २२ ऑक्टोंबर ला आयोजित करण्यात आली होती.परिषदेत शिक्षकांना शासनाकडून योजिलेले मिशन गरूड झेप व न्यासा स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करून शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी सूचना करण्यात आल्या.त्याचप्रमाणे
कोरोना काळात जीवाची बाजी लावून निषिम कार्य करणाऱ्या कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला.त्यात कोरोना योद्धा म्हणून सौ. वैष्णवी अमर बोडलावार जि. प. सदस्या चंद्रपूर यांचा धनराज आवारी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती गोंडपिपरी यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मंचावर राऊत सर विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख मूत्यालवार सर, भसारकर सर,आवळे सर,उराडे सर,सौ. रेखा कारेकर मॅडम, बीट चे सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षिका व शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी अल्लीवार सर,तर आभार प्रदर्शन दुशांत निमकर सर यांनी केले.