चांदूर रेल्वे स्टेशनवर मिळणार लवकरच थांबा!

44

चांदूर रेल्वे स्टेशनवर मिळणार लवकरच थांबा!

चांदूर रेल्वे स्टेशनवर मिळणार लवकरच थांबा!
चांदूर रेल्वे स्टेशनवर मिळणार लवकरच थांबा!

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

चांदूर रेल्वे २३/१०/२१
चांदूर रेल्वे येथील रेल रोको कृती समितीच्या शिष्टमंडळाने नागपूर येथील मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) रिचा खरे यांची नुकतीच भेट घेतली असून चांदूर रेल्वे येथील रेल्वे गाड्यांचे थांबे लवकरच पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याबाबतच नागपूर येथील कार्यालयात सविस्तर सकारात्मक चर्चा झाली.
रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, सदस्य मेहमूद हुसैन, बंडू यादव व विनोद जोशी अशा चार लोकांचे शिष्टमंडळ नागपूर येथील रेल्वे डीआरएम कार्यालयात भेटीसाठी गेले होते. यावेळी बोलतांना शिष्टमंडळाने डीआरएम यांना चांदूर रेल्वेची वस्तुस्थिती सांगतांना म्हटले की, कोरोना काळानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतांना रेल्वे गाड्या सुद्धा सुरू करण्यात आल्या आहे.
चांदूर रेल्वे स्टेशनवर लॉकडाऊन लागण्याआधी विदर्भ एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, हावडा -अहमदाबाद एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा होता. मात्र अनलॉक झाल्यानंतर ह्या सर्व रेल्वेगाड्या सुरू झाल्या असतांना चांदूर रेल्वे स्टेशनवर केवळ विदर्भ एक्सप्रेसचा थांबा देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त इतर सुरू असलेल्या गाड्यांचा थांबा देण्यात आला नाही. चांदूर रेल्वे तालुक्यात 60 ते 70 खेडेगाव आहे. चांदूर रेल्वे येथे रेल्वे थांबा नसल्यामुळे येथील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार तसेच व्यापारी वर्ग यांना खूप त्रास होत आहे. त्यामुळे या सर्व गाड्यांचा स्थानिक रेल्वे स्टेशनवर थांबा पूर्ववत देण्यात यावा अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली आहे.