उप पोलिस स्टेशन देचलीपेठा च्या वतीने भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन*

32

*उप पोलिस स्टेशन देचलीपेठा च्या वतीने भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन*

उप पोलिस स्टेशन देचलीपेठा च्या वतीने भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन*
उप पोलिस स्टेशन देचलीपेठा च्या वतीने भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन*

धनराज आर. वैरागडे ✒
9421527972
गडचिरोली उपजिल्हा प्रतिनिधी

*सिरोंचा* : दिनांक 22/10/2021 रोजी *उप पोस्टे देचलीपेठा* येथे हद्दीतील नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याकरता भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणुन दोडगिर गावचे राष्ट्रीय खेळाडू कु. लच्या दुगा वेलादी हे उपस्थित होते तर पेठा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ बिस्वास, आश्रमशाळा मुख्याध्यापक देशमुख सर, देचली सरपंच श्रीमती वंदना पुजारी, ग्रामसेवक कुमरे, वनरक्षक तसेच हद्दीतील अंगणवाडी सेविका ,आरोग्य साहाय्यक, विद्यार्थी व 300 ते 350 नागरिक उपस्थित होते.
सदर जनजागरण मेळावा दरम्यान कोरोना लसीकरण शिबिर, आयुष्यमान भारत कार्ड, इ-श्रम कार्ड, आरोग्य कार्ड नोंदणी तसेच विविध योजनांचे फॉर्म भरून घेणे, गुणवंत खेळाडूंचा सन्मान इत्यादी चे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरात प्रभारी अधिकारी सुधीर साठे यांनी गडचिरोली पोलीस दलातर्फे पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, प्रशिक्षण शिबिरे यांची माहिती देऊन त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा याबाबत आवाहन करण्यात केले व त्याद्वारे असणाऱ्या रोजगाराच्या संधी बाबत यांना माहिती दिली. तदनंतर पात्र नागरिकांचे विविध योजनांचे फॉर्म भरून घेतले तसेच प्रशिक्षण शिबिरा करिता नाव नोंदणी करण्यात आली. तसेच दोडगीर गावातील ॲथलेटिक्स *राष्ट्रीय खेळाडू लच्चा दुगा वेलादी* याने देहरादून येथे झालेल्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत 400 मीटर धावणे प्रकारात रौप्यपदक प्राप्त केल्यामुळे त्याची नेपाळ येथे होणाऱ्या *आशियाई कॉमन-वेल्थ* स्पर्धेकरिता निवड झाली असल्याने सदर खेळाडूस व कुटुंबीयांचा जाहीर सत्कार करून त्यास रोख बक्षीस देऊन एक महिन्याचे किराणा साहित्य देऊन त्याने केलेल्या कामगिरीबद्दल गौरविण्यात आले व भविष्यात पोलीस दलातर्फे मदतीचे आश्वासन देण्यात आले.

सदर वेळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी बिस्वास यांनी उपस्थितांना कोरोना प्रतिबंध कसा करावा व कोरोना लसीकरणाबाबत जागृती करून लसीकरण घेणेबाबत प्रोत्साहन केले. याचीच परिणीती हद्दीतील 102 नागरिकांनी स्वेच्छेने कोरोना लसीकरण केले.

सदर वेळी उपस्थित महिलांना साडी व नागरिकांना लुंगी व शालेय विद्यार्थी याना शालेय बॅग व साहित्य वाटप करण्यात आले. तदनंतर सर्वांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते .सदर मेळावा आयोजित केल्याबद्दल नागरिकांनी गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले.
सदर मेळावा पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल , मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे , श्री अनुज तारे, श्री समीर शेख यांच्या संकल्पनेतून तसेच मा. SDPO श्री राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सुधीर साठे, पोउपनि गोविंद खटिंग, पोउपनि भारत वर्मा ,जिल्हा पोलिस व SRPF अमलदारांनी संघभावनेने परिश्रम घेऊन यशस्वीरित्या संपन्न केला.