राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

26 लाखाचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: -रायगड जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून दि.15 ते दि.22 ऑक्टोबर या कालावधीत एकूण 107 गुन्हे नोंदविण्यात आले असून 88 आरोपींना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण कारवाईमध्ये 37520 लि.दारु जप्त करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत रुपये 26 लाख 61 हजार 212 आहे. अवैध मद्याच्या व्यवसायात गुंतलेल्या सराईत इसमांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम 93 अंतर्गत एकूण 61 प्रस्ताव विधानसभा मतदारसंघातील उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत. तसेच गुन्ह्यापासून परावृत्त करण्याकरीता एकूण 470 कायदेशीर नोटीस देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here