मुल व पोंभुर्ण्यात सात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र

67
मुल व पोंभुर्ण्यात सात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र

मुल व पोंभुर्ण्यात सात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र

मुल व पोंभुर्ण्यात सात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र

• बल्लारपूर विधानसभेला आरोग्यसेवत तत्पर ठेवण्याचा प्रयत्न

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 22 ऑक्टोबर
राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी आणि त्यांच्या पाठपुराव्यानंतर आता मुल व पोंभुर्णा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सात उपकेंद्रांना राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे.
बल्लारपूर विधानसभेतील मुल व पोंभुर्णा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची अनेक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्राची मागणी होती. त्याची दखल घेत मुनगंटीवार यांनी तसा प्रस्ताव तातडीने संबंधित मंत्रालयाला पाठविला होता. या प्रस्तावाची दखल घेत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने उपकेंद्राच्या मंजुरीची अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये मुल तालुक्यातील चितेगांव, पिंपरी दीक्षित, फिस्कुटी, सुशी, तर पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम, फुटाणा व जामतुकूम या गावांमध्ये उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘विशेष बाब’ म्हणून या केंद्रांना मंजुरी दिल्याचे पत्रात नमूद आहे.
======
मुल येथे 107 कोटी रुपयांचे आधुनिक रुग्णालय
मुल येथे 107 कोटी रुपयांचे 100 खाटांचे आधुनिक रुग्णालयाचे भूमिपूजनही नुकतेच पार पडले. केवळ मुल नव्हे तर परिसरातील प्रत्येकाला हे आरोग्य मंदिर वाटेल अशी त्यामागची संकल्पना मुनगंटीवार यांची आहे. यापूर्वी आरोग्यक्षेत्रातील अनेक कामे मुनगंटीवार यांनी केली आहे. बल्लारपूर येथे ग्रामीण रुग्णालय, ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, पोंभुर्णा येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती, पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र अशी असंख्य कामे झाली आहे.