किल्ले बनवण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला

151

किल्ले बनवण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला

किल्ले बनवण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला

भागवत जाधव
अलिबाग
८८०५०२२५६५

क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीछत्रपती शिवाजीमहाराज की जय !

आपल्या हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन, संरक्षण, स्वच्छता, पावित्र्य आणि याचसह नवीन पिढीला त्याच्या महत्त्वासह अभ्यासपूर्ण माहितीच्या व्यापक हेतूने ग्रामपंचायत चेंढरे हद्दीतील लहानथोर सर्व नागरिकांसाठी *चेंढरे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच सौ. प्रणिता प्रल्हाद म्हात्रे* यांनी दिवाळीनिमित्त किल्ला बनवण्याची खुली स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आज स्वतः *चेंढरे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच सौ. प्रणिता म्हात्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ यशोमती पाटील* यांच्यासह विद्यानगर परिसरातील साठहून अधिक तरुण मित्रमंडळी यांच्याकडून सदर स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत *छत्रपती शिवाजीमहाराजांची* प्रतिमा भेट म्हणून दिली गेली. पश्चिम, चेंढरे परिसरातील तरुणांनी, महिला यांनी अशा प्रकारच्या उपक्रमातून आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळाली असून, पुढील वर्षी याहीपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर सदरच्या स्पर्धेत सहभाग घेण्याचे अभिवचन मुलांसह, तरुण मित्रमंडळींनी दिले. अखेर परस्परांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन, कार्यक्रमाची सांगता झाली. यामध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांसह, बक्षीस वितरणासाठी आलेल्या महिला व इतर सर्व नागरिक बंधुभगिनींचे सौ. प्रणिता प्रल्हाद म्हात्रे श्री प्रल्हाद म्हात्रे यांनी आभार मानले. विजेते पुढील प्रमाणे
१) श्री. प्रभाकर माळवदे
२) श्री. अमोल सर
३) श्री.सीगल सोसायटी.