जननायक बिरसा मुंडा यांची जयंती ग्रामपंचायत ईसासनी येथे साजरी.

53

जननायक बिरसा मुंडा यांची जयंती ग्रामपंचायत ईसासनी येथे साजरी.

जननायक बिरसा मुंडा यांची जयंती ग्रामपंचायत ईसासनी येथे साजरी.
जननायक बिरसा मुंडा यांची जयंती ग्रामपंचायत ईसासनी येथे साजरी.

✒देवेंद्र सिरसाट✒
हिंगणा तालुका जिल्हा नागपूर.

हिंगणा:- महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था, डॉ. बाबासाहब आम्बेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, समतादूत प्रकल्प नागपुर विभाग तालुका हिंगणाच्या वतीने जननायक बिरसा मुंडा यांच्या 146 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.

सर्व प्रथम जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला ग्रामपंचायत ईसासनीचे सरपंच निलेश उईके यांच्या हस्ते माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच निलेश उईके अतिथी म्हणून राहुल खुडसंगे तर कार्यकर्माचे मार्गदर्शक म्हणून समतादूत सतीश सोमकुवर होते या प्रसंगी सोमकुंवर यांनी जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले, या वेळी सोमकुवर म्हणाले की बिरसा मुंडा यांनी ब्रिटीश सत्ते विरुद्ध क्रांतिकारी आंदोलन उभारुन भारतला गुलामीतून मुक्त करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. तसेच आपल्या आदिम जमातीमध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. म्हणूनच त्यांना जनानायक संबोधल्या गेले. या महापुरुषांनी भारत भूमीला व आपल्या आदिम समाजाला गौरव प्राप्त होईल उल्लेखनिय कार्य केल्यामुळे ते संपुर्ण मावन समाजासाठी प्रेरणास्थान बनले आहे असेही सोमकुवर म्हणाले,या वेळी उपस्थितांना जननायक बिरसा मुंडा जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सर्व सदस्यगण, कर्मचारी आदिवासी समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर प्रदान तर किशोर सिडाम यांनी आभार मानले.