कारंजा नगरपंचायत निवडणुकी मध्ये संभाजी ब्रिगेडची एन्ट्री.

✒️कारंजा घाडगे प्रतिनिधी✒️
कारंजा घाडगे:- संभाजी ब्रिगेच्या केंद्रीय आदेशानुसार संभाजी ब्रिगेड कारंजा नगरपंचायत निवडणूक लढविणार आहे. संभाजी ब्रिगेडची केंद्रीय आढावा बैठक औरंगाबाद येथे घेण्यात आली, या बैठक मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संभाजी ब्रिगेडच्या केंद्रीय आढावा बैठकी नंतर संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज आखरे यांनी पत्रकार परिषद घेतली. संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रातील संपूर्ण छोट्या मोठ्या निवडणुकी मध्ये सहभाग घेणार असल्याचे त्यांनी संगितले.
राज्यातील आघामी होणा-या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व ग्रामपंचायत मध्ये होणाऱ्या निवडणुकी मध्ये संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकतीने निवडणूक लढविणार असल्याचे आखरे यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले. त्याचप्रकारे वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे, सेलू व आष्टी येथे होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकी मध्ये संभाजी ब्रिगेड कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती न करता स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रफुल क्षीरसागर यांनी सांगितले .
कारंजा घाडगे नगरपंचायत निवडणुकी मध्ये संभाजी ब्रिगेड कारंजा शहरातील 17 ही जागेवर पक्षाचे उमेदवार देणार. संभाजी ब्रिगेडचे स्थानीय नेते पियुष रेवतकर यांच्या नेतृत्वात कारंजा मध्ये संभाजी ब्रिगेड निवडणूक लढविणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. संभाजी ब्रिगेडची विचारधारा आणि संभाजी ब्रिगेडनी आज पर्यंत केलेल्या कामावर आम्ही लोकांना मते मागू असे रेवतकर आढावा बैठकी मध्ये मत व्यक्त करताना म्हणाले.
कारंजा मध्ये आज पर्यंत नझालेल्या विकासापासून आणि काँग्रेस भाजपाला त्रासून लोकांना संभाजी ब्रिगेड एकनवी आशा दिसून येत आहे. कारंजा नगरपंचायत निवडणुकी मध्ये आणि नंतर होणाऱ्या पंचायतसमिती, जिल्हापरिषद मध्ये संभाजी ब्रिगेडच सत्ता बसविणार असे रेवतकर म्हणाले.
नगरपंचायत निवडणुकी मध्ये इतर राजकीय पक्षांना घमफोडून त्यांना असलेलं घमंड ह्या वेळेला संभाजी ब्रिगेड नष्ट करणार. कारंजा नगरपंचायत मध्ये संभाजी ब्रिगेड ची एन्ट्री झाल्या नंतर कारंजा मध्ये त्रिकोनिय मुकाबला चित्र पाहायला मिळत आहे. मात्र समोर याचा परिणाम काय होणार ह्या वर सगळ्यांच लक्ष आहे.