नागभीड: पैगंबर मोहम्मद बिल व मुस्लिम समाजाचे आरक्षण तात्काळ लागु करण्यात यावे: वंचित बहुजन आघाड़ी
निवेदन देताना वंचित बहुजन आघाड़ीचे कार्यकर्ते

नागभीड: पैगंबर मोहम्मद बिल व मुस्लिम समाजाचे आरक्षण तात्काळ लागु करण्यात यावे: वंचित बहुजन आघाड़ी

नागभीड: पैगंबर मोहम्मद बिल व मुस्लिम समाजाचे आरक्षण तात्काळ लागु करण्यात यावे: वंचित बहुजन आघाड़ी
निवेदन देताना वंचित बहुजन आघाड़ीचे कार्यकर्ते

✒️अरुण भोले✒️
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731

नागभीड:- पैगंबर मोहम्मद बिल आणि मुस्लिम समाजाला ५% आरक्षण मिळण्या संदर्भात बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार २२/११/०२१ ला तहसिदार द्वारे मुख्यमंत्री याना निवेदन देण्यात आले मागील अधीवेशनात वंचित बहुजन आघाड़ी ने विधानपरिषद सदस्य कपील पाटील यांच्या माध्यमातुन “पैगंबर मुहम्मद बिल” विधानपरीषद मध्ये मांडले होते. न्यायालयाने मान्यता दिलेल्या मुस्लिम समाजाच्या ५% शैक्षणिक आरक्षण तात्काल लागु करण्यात यावे.
धार्मिक भावनेत तेढ निर्माण करणा-यावर कठोर शिक्षा देणारे पैगंबर मोहम्मद बिल वंचित बहुजन आघाड़ी ने शासनाला सपुर्द केले आहे ते बिल येणा-या अधिवेशनात मंजुर करून तात्काळ कायद्यात रुपांतर करावे. महाराष्ट्र व वक्फ बोर्डाच्या मिळकती मध्ये वाढ करुन इमाम, मोईजीन, खुदाम, हजरत यांना मासिक वेतन सुरू करावे व वक्फ बोर्डाच्या जमिनीवर अवैध झालेला कब्जा हटवुन त्या जागेचा अल्पसंख्यक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा. संत विचाराचे प्रसार, प्रचार, करणा-या ह.भ.प. किर्तनकार यांना मासिक वेतन देण्यात यावे. सार्थी, बार्टी, महाज्योती, प्रमाने मुस्लिम अल्पसंख्यक समाजातील विद्यार्थ्थानसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी वरील सर्व मागण्या संदर्भातील पैगंबर मोहम्मद बिल सरकारने लागु करावे करीता वंचित बहुजन आघाड़ी नागभिड तर्फे तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष खेमदेव गेडाम, महीला अध्यक्षा कल्पना खरात, शहर अध्यक्ष मानिक दोहीतरे, प. स प्रमुख कान्पा धर्मविर गराडकार, कैलास जांभुळे, गिरीधर नन्नावरे, प्रमोद माहुरे , प्रवीन दडमल, प्रशांत जांगडे, भगवान गायकवाड़, प्रल्हाद गेडाम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here