येणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रेषित मोहमद पैगंबर बिल पास करून तात्काळ कायदा करा: वंचित बहुजन आघाडी
वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन.

✒ उषाताई कांबळे ✒
सांगली शहर प्रतिनिधी
📲75076 00122📲
सांगली,दि.22 नोव्हें:- मुस्लिम समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणाबद्दल केंद्र व राज्य शासनाकडे विविध समित्यांचे आणि आयोगाचे अहवाल पडून आहेत. मात्र शासन मुस्लिम समाजाच्या विकासाबाबत कायमच उदासीन असल्याचे दिसून येते त्याच बरोबर ह्या समाज्याबद्दल नेहमीच गैरसमज पसरवण्यात आलेले आहे काहि माथेफिरू मुळे संपूर्ण समाज्याला दोषी धरले जाते आणि समाजातील थोर, सुफी संत इत्यादी प्रकारे भडकावू भाषण, सोशल मीडियावरून होणाऱ्या पोष्ट इत्यादींवर रोक लविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर ह्यांच्या मार्फत ५ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्र सरकारला स्वाधीन केलेल “प्रेषित पैगंबर मोहमद बिल” लागू केल्याशिवाय पर्याय दिसत नाही म्हणून आम्ही आपणा द्वारे ज्या मागण्या राज्य सरकारला पाठवत आहोत त्या लवकरात लवकर मान्य करावे
मागण्या पुढील प्रमाणे
१) न्यायालयाने मान्य केलेल्या ५% मुस्लिम आरक्षणाची शासन अंमलबजावणी करीत नाही.
२) धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्याना कठोर शिक्षा देणारे “प्रेषित पैगंबर मोहमद बिल” वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र शासनास सुपूर्त केले आहे, विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांच्या माध्यमातून गेल्या अधिवेशनात ते बिल विधिमंडळात मांडण्यात आले होते. येणाऱ्या अधिवेशनात प्रेषित पैगंबर मोहमद बिल विधिमंडळात मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा.
३) महाराष्ट्र वक्फ बोर्ड च्या मिळकतीमध्ये वाढ करून इमाम व मुअजिन, खुद्दाम हजरात यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे.
४) संत विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्या ह.भ. प. कीर्तनकार यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे.
५) वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेले अवैध्य कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा.
६)सारथी, बार्टी, महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी.
आमच्या या मागण्या मान्य करून अल्पसंख्याक समाजातील जनतेला दिलासा द्यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी मार्फत सनदशीर मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, उमर फारूक ककमरी, संजय कांबळे, चंद्रकांत खरात, अकिल शेख, अस्लम मुल्ला, वासिम मुल्ला, अशोक लोंढे, शहानवाज सौदागर, गौतम लोटे, विशाल धेंडे, प्रवीण लोखंडे, सतिश शिकलगार, शितल कोलप, अनिल कांबळे, निखिल शास्त्री आदी उपस्थित होते.