सातारा: मुस्लिम आरक्षणासह ईतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन.

✒सतारा जिल्हा प्रतिनिधी✒
सातारा:- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी आज संपुर्ण महाराष्ट्रात मुस्लिम आरक्षनासह ईतर मागण्यासंबंधी एक दिवसीय धरणे आंदोलन व मोर्चा आंदोलन जाहीर केले होते. त्यानुसार आज सातारा येथे आंदोलन करुन निवेदन देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खालील मागण्यांचे निवेदन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने तहसीलदारांच्या मार्फत शेकडो कार्यकर्ताच्या उपस्थितीत देण्यात.
निवेदनातील मागण्या
● मा सर्वोच्च न्यायालयांनी दिलेल्या मान्यतेनूसार मुस्लिमांना 5 टक्के शैक्षणिक आरक्षण लागु करावे
● धार्मिक भावना दुखावुण धर्मा धर्मात समाजासमाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाज कंठकावर कठोर शिक्षा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी सरकारला दिलेल्या पैगंबर मोहम्मद बिल येणाऱ्या अधिवेशनात मंजुर करावे
● महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या निधित वाढ करून इमाम मुअज्जीन आणि खूद्दान हजरात
यांना शासकीय मासिक वेतन चालु करावे
● संतांच्या विचाराचा प्रचार व प्रसार करणाऱ्या ह भ प व कीर्तनकार प्रबोधनकार .टाळकरी वाळकरी यांना मासिक वेतन चालु करावे
● वयवृद्ध कलाकार, शाहीर, भजनकार कव्वाल, प्रबोधनकार, नकलाकार यांना मिळत असलेले मासिक अनुदान गेल्या दोन वर्षापासून बंद आहेत तसेच त्यांचे कार्यक्रमही बंद असल्यामुळे त्यांचेवर उपासमारीची वेळ आलेली आहे त्या कलाकारांचे थकीत अनुदान एकमुस्त देण्यात यावे.
● वक्फ बोर्डाच्या जमिनी उध्योगपती व्यावसायिक व बिल्डर यांच्या ताब्यात आहे त्या जमिनी वापस घेवुन त्यावर समाजभवण बांधुन मुस्लिम व अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी द्यावे.
● सारथी, बार्टि, महाज्योती सारख्या शैक्षणिक प्रशिक्षण संस्था मुस्लिमांसाठीही स्वतंत्र स्थापन कराव्या या मागण्यासाठी आंदोलन करून निवेदन देण्यात आले.
आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सातारा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. या निवेदनातिल मागण्यावर तात्काळ दखल घ्यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळेस निवेदनातून दिला आहे.
यावेळी निवेदन देते वेळेस वंचित बहुजन आघाडीचे सुभाष गायकवाड सातारा जिल्हा उपाध्यक्ष, आमीरखान हिम्मतखान मेटकरी, विकास निकळजे माजी सचिव फलटण, रणजित मोहिते, फलटण तालुका संघटक, राहुल कांबळे फलटण तालुका फुले, शाहू आंबेडकर विद्वत सभा,नितीन मोहिते फलटण तालुका माजी उपाध्यक्ष, विजय कांबळे, चित्राताई गायकवाड सातारा जिल्हा उपाध्यक्ष, सपनाताई भोसले फलटण शहर अध्यक्ष तथा मयुरी गायकवाड सह शेकडो कार्यकर्ते उपस्थीत होते.