वर्धा जिल्हात एसटी आंदोलन: 62 निलंबित 48 कर्मचा-याची सेवा समाप्ती.
●वर्धा जिल्हातिल 100 एसटी कर्मचारी मुंबई येथील आंदोलनात सहभागी.
● आज आंदोलनाचा 26 वा दिवस
● कर्मचा-यांचा परिवार आंदोलनात सहभागी.

✒ मुकेश चौधरी ✒
उप संपादक मिडिया वार्ता न्युज
📲 75071 30263 📲
वर्धा:- एसटीचे शासनामध्ये विलिनिकरन करण्यात यावे व कर्मचा-यांच्या विविध मागण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. त्या वर्धा जिल्हात माघील अनेक दिवसा पासून एसटी कर्मचा-यांचे आंदोलन पेटले आहे. एस.टी कर्मचा-यांच्या आंदोलनाचा मंगळवारी 27 वा दिवस आहे.
या आंदोलनात सहभागी वर्धा जिल्हातील एसटी कर्मचा-यांना व शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या अधिनस्थ येत असलेल्या 62 कर्मचा-यांचे निलंबन केले तर 48 कर्मचा-यांना सेवा समाप्तीची नोटिस देण्यात आली. त्यामुळे या सर्व एसटी कर्मचा-यांचे जिवन अंधारमय झाले आहे.
वर्धा जिल्हातील सेवा समाप्तीचे नोटिस बजावण्यात आलेल्या कर्मचारी यांची संख्या त्यामध्ये वर्धा 4 आर्वी 13 हिंगण 21, पुल्गाव 4 आणि तळेगाव 6 कर्मचा -याना सेवा समाप्तीची नोटिस देण्यात आली आहे.
मुंबई येथे सुरु असलेल्या राज्य व्यापी आंदोलनात वर्धा जिल्हातून 100 पेक्षा जास्त कामगार मुंबई येथे गेले आहे. अशी माहिती प्राप्ती झाली आहे.