अहमदनगर कर्जबाजारी पणाला कंटाळून स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन अखेर शेतकर्‍याची आत्महत्या.

कैलास नेमाने यांच्याकडे दोन एकर जमीन होती. कर्ज फेडण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी अर्धा एकर जमीन विकली होती. तरीही कर्ज फिटले नव्हते काही कर्ज बँकेचे तर काही खाजगी सावकाराचे होते. यामुळे गेल्या दहा दिवसांपासून ते मोठ्या मानसिक तणावाखाली होते.

जामखेड:- तालुक्यातील साकत-कडभनवाडी येथील कैलास रामचंद्र नेमाने वय 42 या शेतकर्‍याने कर्जबाजारी पणाला कंटाळून स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कडभनवाडी (साकत) येथील कैलास नेमाने यांच्याकडे दोन एकर जमीन होती. कर्ज फेडण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी अर्धा एकर जमीन विकली होती. तरीही कर्ज फिटले नव्हते काही कर्ज बँकेचे तर काही खाजगी सावकाराचे होते. यामुळे गेल्या दहा दिवसांपासून ते मोठ्या मानसिक तणावाखाली होते. अशी माहिती नातेवाईकांनी दिली. यातच दि 22 रोजी सकाळी अकराच्या सुमारास वाडीच्या जवळ असणार्‍या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची खबर पोलिस पाटील महादेव वराट यांनी जामखेड पोलीसांना दिली पोलीसांनी ताबडतोब घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रूग्णालयात आणला वैद्यकीय अधिकारी डॉ संजय वाघ यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. नेमाने यांना दोन मुले एक विवाहित मुलगी आई, वडील असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here