गोंदीया: मनोहभाई पटेल महाविद्यालय देवरी येथील महाविद्यालयीन अशासकीय शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442
गोंदीया;- जिल्हातील मनोहभाई पटेल महाविद्यालय देवरी येथील महाविद्यालयीन अशासकीय शिक्षकेत्तर कर्मचारी दि.18 डिसेंबर पासुन बेमुदत संपावर आहेत.
शासनाकडून आज पर्यंत सातवा वेतन आयोग लागू झाला नाही, आश्वाशीत प्रगती योजनेचे लाभ दिल्या गेले नाहीत, इतर मागण्यांसाठी कर्मचारी संपावर आहेत. सबंधित सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना प्राचार्य डॉ. अरुण झिंगरे सर आणि महाविद्यालयात तील सर्व शिक्षक कर्मचारी यांनी सुद्धा यांच्या या संपाला समर्थन दिले आहे.मनजीत सिंग निर्वाण यांनी आवाहन केले की गोंदिया जिल्हयातिल आंदोलनाला आपण सर्व कर्मचारी साथ देवून आंदोलन अधिक बळकट करून आपल्या मागन्या आपल्या पदरात पाडुन घेवून आपले आंदोलन यशस्वी करुन घेवू.