शहरातील “वाहतूक कोंडी” नियंत्रित करा – प्रा. सुयोगजी बाळबुधे  उपविभागीय पोलीस अधिकारी यांना भा. ज. यु. मोर्चाद्वारे निवेदन

60

शहरातील “वाहतूक कोंडी” नियंत्रित करा – प्रा. सुयोगजी बाळबुधे

 उपविभागीय पोलीस अधिकारी यांना भा. ज. यु. मोर्चाद्वारे निवेदन

शहरातील "वाहतूक कोंडी" नियंत्रित करा - प्रा. सुयोगजी बाळबुधे  उपविभागीय पोलीस अधिकारी यांना भा. ज. यु. मोर्चाद्वारे निवेदन
शहरातील “वाहतूक कोंडी” नियंत्रित करा – प्रा. सुयोगजी बाळबुधे
 उपविभागीय पोलीस अधिकारी यांना भा. ज. यु. मोर्चाद्वारे निवेदन

क्रिष्णा वैद्य
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

ब्रम्हपुरी :- मनुष्य जगण्यासाठी त्याच्या शरीरातील रक्तवाहिन्यांचे जाळे जितके महत्वाचे आहे, तितकेच महत्व कोणत्याही शहरातील वाहतूक मार्गाचे, मात्र या रचनेला खंत वाटावी असे रस्त्यावरील वाढणारे अपघात व त्यातील बळी पडणाऱ्यां संख्येवरून लक्षात येत आहे. शहरातील “वाहतूक कोंडी” सोडवून शहर अपघातमुक्त करावे अशी महत्वपूर्ण मागणी भारतीय जनता युवा मोर्चा शहर अध्यक्ष श्री सुयोगजी बाळबुधे यांनी केली आहे.

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने वाहणाची संख्या सुद्धा शहरात वाढली आहे. मात्र शहरात पार्किंग सुविधा नसणे, मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या अतिक्रमणाने झालेले अरुंद रस्ते, अवैध प्रवासी वाहणांची शहराच्या मध्यवर्ती भागात होत असलेली गर्दी, गरजेच्या ठिकाणी गतिरोधक नसणे व प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणाने शहरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
प्रशासनास भा.ज. यु. मोर्चा तर्फे नम्र विनंती करीत,शहरात होतं असलेली “वाहतूक कोंडी’ सोडविण्यासाठी प्रशासनाकडून न्यायिक व कठोर निर्णय घेण्यात येऊन नागरिकांना दिलासा देण्यात यावा अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे शहरात तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्यात येईल असे
निवेदन सादर करण्यात आले निवेदन देतांना भा ज यु मो शहर अध्यक्ष प्रा.सुयोग बाळबुधे, महामंत्री रितेश दशमवार,सचिव दत्ता येरावार,उपाध्यक्ष अमित रोकडे,पवन जयस्वाल भाजपा शहर महामंत्री मनोज भूपाल, साकेत भानारकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सदर निवेदन पालकमंत्री चंद्रपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर,पोलीस अधीक्षक चंद्रपूर व नगरपरिषद मुख्याधिकारी ब्रम्हपुरी यांना सुद्धा पाठवण्यात येऊन, समस्या अवगत करून देत शहरासाठी गंभीर बनत चाललेल्या मुद्यावर उपाययोजना करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे करण्यात आली आहे.