विपुन भारत अभियान अंतर्गत जि.प.उच्च प्राथ.शाळा,मानोली खुर्द येथे राष्ट्रीय गणित उत्सव साजरा

खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतीनीधी
8378848427
श्रीनिवास रामानुजन गणित तज्ञ यांच्या जयंती निमित्त शाळेत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले, गणित चिंन्हाकित रांगोळी स्पर्धा, राष्ट्रीय व काॅपरेटीव बॅक स्लिप भरणे,गणित उखाणे, गणित कविता, मोबाईल फोन ऑपद्वारे गणित कोडी स्पर्धा, व विविध प्रकारच्या दुकानांची स्टाॅल मांडणी करुन विद्यार्थी व्यावसायिक व व्यावहारीक देवाणघेवाणीतून गणित ओळख करून घेतले अवघड वाटणारा विषय आनंदाने समजून घेतले,या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. जि. व्ही.पवार सर, उदघाटन, सौ. थिपे मॅडम, प्रमुख मार्गदर्शक सौ. सिता मेश्राम, कु. रायपुरे व वनपाल सोयाम सर तसेच शा. व्या. स. अध्यक्ष शंकर रामटेके आजच्या काळात गणिताचे महत्त्व वेगवेगळ्या गोष्टीतून स्पष्ट केले, शाळेचे मुख्यमंत्री यश नैताम यांनी आभार मानले तर सुत्रसंचालन सुप्रीम व संस्कृती या विद्यार्थिनीने केले, गणित विषय शिक्षक राजेश पवार यांनी कार्यक्रमाचे सुनियोजित आयोजित केले.