निंबाळा येथे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमीपूजन

51
निंबाळा येथे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमीपूजन

निंबाळा येथे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमीपूजन

निंबाळा येथे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमीपूजन

राजूरा तालुका प्रतिनिधी
✍🏽शुध्दोधन निरंजने✍🏽
9921115235
राजुरा :– राजुरा तालुक्यातील
मौजा कळमना ग्रामपंचायत अंतर्गत निंबाळा येथे कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. येथे 25 15 ग्रामीण विकास निधी अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करण्यासाठी 15 लक्ष रुपये निधी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली प्राप्त झाला त्यामुळे निंबाळा येथील जनतेचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला. निंबाळा येथे पायाभूत सुखसुविधा निर्माण झाली. त्याच बरोबर 15 व्या वित्त आयोगाच्या निधी अंतर्गत नाली बांधकामांचे भुमीपुजन करण्यात आले. यावेळी निंबाळा येथील नागरिकांनी कळमनाचे सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या प्रयत्नाने येथे होत असलेल्या विविध विकासकामांबाबत समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दिपक झाडे, प्रियंका गेडाम, पोलिस पाटील निंबाळा गोपाल पाल, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, ग्राम सेवक मरापे, महादेव ताजणे माजी तंटामुक्ती अध्यक्ष, जेष्ठ नागरिक महादेव मेश्राम, भिवसन मोटघरे, प्रभाकर पाल, नामदेव देवाळकर, भोंगळे सर, सुरेश गौरकार, दौलत मोटघरे, खेमदेव देवाळकर, नामदेव पाल, वासुदेव मेश्राम, निलकंठ मोटघरे, शंकर चिंचोलकर, मुरलीधर पेदोर, मधुकर पेदोर, जनार्दन मोटघरे, बंडु मोहारे, मोतीराम झाडे, शिपाई सुनील मेश्राम, विशाल नागोसे यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.