टेकरी मध्ये गुंजणार सप्तखंजेरी वादक इंजि. भाऊसाहेब थुटे यांची खंजेरी
सिंदेवाही प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी
8275553131
सिंदेवाही :- श्री गुरुदेव सेवा मंडळ टेकरी च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दि. 24 डिसें. ते 25 डिसें. दोन दिवसीय वंदनीय तुकडोजी महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे, त्यानिमित्याने विविध कार्यक्रम आयोजित केले आहे त्यातच दिनांक 24 डिसेंबर मंगळवारी रात्री 7 वा. सप्तखंजेरी वादक , राष्ट्रीय कीर्तनकार इंजि. भाऊसाहेब थुटे यांच्या कीर्तनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तसेच दिनांक 25 डिसेंबर ला सकाळी 8 वा.रामधूनच्या विषयावर तसेच दुपारी 3 वा. सुद्धा युवा राष्ट्रीय प्रबोधनकार राजदादा घुमणार यांच्या वक्तृत्वाची तोफ गरजणार आहे, या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच काल्यावर ह. भ. प. अनिल महाराज खामणकर यांचे कीर्तन होणार आहे यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष केशवं मंडलवार आणि सचिव वासुदेव गायकवाड यांनी केले आहे…