‘सोहराबुद्दीन’ खटला: वार्तांकन बंदी बेकायदा

98
मुंबई : गुजरातमधील कथित सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याच्या वार्तांकनावर बंदी घालणारा मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टाचा आदेश मुंबई हायकोर्टाने बुधवारी बेकायदा ठरवत रद्दबातल ठरवला.

भाजप अध्यक्ष अमित शहा हे या प्रकरणात आरोपी असताना सीबीआय कोर्टाचे माजी न्यायाधीश बी. एच. लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर, या प्रकरणात आरोपी असलेल्या काही पोलिस अधिकाऱ्यांच्या वतीने मीडियावरील बंदीसाठी अर्ज करण्यात आले होते. त्यावर निर्णय देताना सीबीआय कोर्टाने गेल्या वर्षी २९ नोव्हेंबरला हा बंदीचा आदेश काढला होता. त्याविरोधात काही पत्रकारांनी आणि पत्रकार संघटनेने दोन याचिका केल्या होत्या. त्यावर न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.