नोकरीला लावण्याचे आमीष दाखवून युवतीवर बलात्कार.
कणकवली:- नोकरीला लावण्याचे आमीष दाखवून युवतीवर बलात्कार करणारा रतन विष्णु कांबळे रहणार नागवे रोड, कणकवली याला येथील न्यायालयाने 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे.
कांबळे याने विवाहित असल्याचे न सांगता नोकरीला लावतो, असे सांगून फसवणूक केली अन् शारीरिक संबंध ठेवले, अशी तक्रार पीडित युवतीने कणकवली पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी कांबळे याला अटक करून येथील न्यायालयात उपस्थित केले होते. या वेळी सरकारी अधिवक्ता गजानन तोडकरी यांनी कांबळे याच्यावर आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणी कणकवली आणि राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील पोलीस ठाण्यांत तक्रारी नोंद असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.