The doctor's husband tried to burn alive the married daughter of a police officer as she had another daughter.
The doctor's husband tried to burn alive the married daughter of a police officer as she had another daughter.

दुसरीही मुलगी झाली म्हणून पोलीस कर्मचाऱ्याच्या विवाहित मुलीला डॉक्टर पतीने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

बीड :- एकीकडे मुलींच्या जन्माचं स्वागत व्हावं, सन्मान व्हावा त्यांना समतेची वागणूक मिळावी म्हणून शासन प्रशासन झटत आहे. समाजातल्या सुशिक्षित वर्गाकडून मुलगा-मुलगी समानतेची आशा सगळेच जण बाळगतात. मात्र राष्ट्रीय कन्या दिवसाच्या पूर्वसंध्येला बीडमधून हादरवून सोडणारी बातमी आहे. दुसरीही मुलगी झाली म्हणून पोलीस कर्मचाऱ्याच्या विवाहित मुलीला डॉक्टर पतीने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

वंशाचा दिवा हवा या हव्यासापोटी माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो याचा काही नेम नाही. याच हव्यासापोटी बीडमध्ये दुसरीही मुलगीच झाल्याने सासरच्या लोकांनी विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे ही विवाहिता पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी आहे. तिच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पीडितेची तक्रार घेण्याऐवजी उस्मानाबादच्या कळंब पोलिसांनी विवाहितेला हाकलून दिल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला होता.

पोलिसाच्याच मुलीबद्दल झालेल्या दुरव्यवहार लक्षात येताच कळंब पोलिसांनी मध्य रात्री बीडचे शासकीय रुग्णालय गाठले आणि पीडितेची तक्रार घेत डॉक्टर पती आणि सासरच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे. विशाल घुगे असं आरोपी डॉक्टरचं नाव असून गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला आहे.

आरोपी विशाल घुगे हा बार्शी तालुक्यातील पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गतवर्षी मुलींच्या जन्मदारात वाढ व्हावी यासाठी जनजागृती मोहिमेची जबाबदारी याच विकृत डॉक्टरकडे होती. मात्र स्वतःलाच दुसरी मुलगी झाली म्हणून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याने याच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या या नीच कृत्यामुळे डॉक्टरी पेशा पुन्हा एकदा कलंकीत झाला आहे.

मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी विशाल घुगे हा पसार झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. दरम्यान या विकृत डॉक्टरला कायमस्वरूपी बडतर्फ करून त्याची पदवी रद्द करावी अशी मागणी मनसेच्या जिल्हाप्रमुख रेखा अंबुरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here